Sunday, February 27, 2022

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात दिशाच्या आईने केला गुन्हा दाखल...

वेध माझा ऑनलाइन - दिशा सालियन आत्महत्या प्रकरणामध्ये आपल्या मुलीबद्दल पत्रकार परिषदा घेऊन वाटेल ते आरोप करणारे भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचा आमदार मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात आता दिशाच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.  मुंबईतील मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाच्या आईने हा गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी जे आरोप केले होते, त्याविरोधात खोटे आरोप करणे, चुकीची माहिती देणे आणि बदनामी करण्याबाबत हा गुन्हा दाखल केला आहे.

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात कलम 500, 509 आणि आयपीसी कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हा जगू द्या अशी हात जोडून विनंतीच त्यांनी केली आहे.यावेळी दिशाच्या आईने म्हटलं, राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. जगू दिलं जात नाहीये. आम्हाला आता त्रास देऊ नका, आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती सोडून गेली, यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे? असा सवालही उपस्थित केला.

No comments:

Post a Comment