सातारा दि (जिमाका)
जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 101 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर245 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे
तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 13 खंडाळा 4खटाव 16 कोरेगांव 4 माण 11महाबळेश्वर 4 पाटण 5 फलटण 13 सातारा 16 वाई 9 व इतर 4 आणि नंतरचे वाढीव2असे आज अखेर एकूण 101 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात...
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 245 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 44,877 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 684 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात 5,08,665 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,37,045 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment