Tuesday, February 22, 2022

लवकरच 2 ते 6 वयोगटातील मुलांसाठी लस होणार उपलब्ध ; कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत होणार पूर्ण...

वेध माझा ऑनलाइन - एक मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत फक्त 12 वर्षांवरील मुलांनाच कोरोनाची लस दिली जात होती. मात्र आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलंही देशात सर्वात कमी वयात कोरोनाची लस घेणारी मुलं बनली आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं विकसित केलेले कोवोवॅक्स ट्रायल दरम्यान 2 ते 6 वयोगटातील 230 मुलांना देण्यात आलं. या मुलांना Covovax चा पहिला डोस आधीच मिळाला आहे. या मुलांना Covovax चा दुसरा डोस 21 दिवसांनी दिला जाईल. कोवोवॅक्सची ट्रायल मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. यानंतर 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोवोवॅक्स लस दिली जाईल.

देशाच्या विविध भागांतील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायलदरम्यान या मुलांना कोवोवॅक्स लस देण्यात आली. कोवोवॅक्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, देशातील 10 रुग्णालयांमध्ये ट्रायल दरम्यान 230 सर्वात लहान मुलांना ही लस देण्यात आली आहे. भारतात कोवोवॅक्सची ही एडवांस ह्युमन ट्रायल आहे.


ऑगस्टमध्ये सुरु झालं होतं ट्रायल

फेज 2 आणि फेज 3 मुलांवर कोवोवॅक्सच्या ट्रायल ऑगस्टमध्ये सुरू झाल्या होत्या. या ट्रायलमध्ये एकूण 920 मुले सहभागी होत आहेत. यामध्ये 12 ते 17 वयोगटातील 460 मुले, 7 ते 11 वर्षे वयोगटातील 230 मुले आणि 2 ते 6 वर्षे वयोगटातील 230 बालकांचा समावेश आहे. सीरम इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त, भारत बायोटेक, दोन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांवरही कोवॅक्सिनची ट्रायल करत आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने प्रथम किशोरवयीन मुलांवर कोवोवॅक्सची ट्रायल घेण्याच्या मंजुरीसाठी औषध नियामक संस्थेकडे अर्ज केला होता. सीरम इन्स्टिट्यूटला 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर ट्रायल घेण्यास मान्यता देण्यात आली. जेव्हा त्यांना किशोरवयीन मुलांवरील सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची खात्री होती. त्यानंतर आता 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांवर याची ट्रायल केली जात आहे.

प्रोटिन आधारित लस

किशोरवयीन मुलांवरील ट्रायलच्या सर्व पॅरामीटर्सवर सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर, सीरम इन्स्टिट्यूटनं 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ट्रायल सुरू केली आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आम्ही प्रथम किशोरवयीन मुलांवर याची ट्रायल केली. त्यानंतर 7 ते 11 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल करण्यात आली आणि आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर ही ट्रायल केली जात आहे. या मुलांवर पुढील सहा महिने लक्ष ठेवण्यात येणार आहे. ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म Novavax द्वारे विकसित केलेली प्रोटीन-आधारित लस आहे. त्याचा भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार आहे. भारतात ते Covovax या ब्रँड नावानं ओळखलं जातं.

No comments:

Post a Comment