वेध माझा ऑनलाइन
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असल्यामुळे सरकारने अजूनही दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा आंदोलक कार्यकर्ते संतापले आहे. उद्यापासून राज्यभरात आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. पण, आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
मुंबईतील आझाद मैदानात खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहे. आज दुसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती खालावत चालली आहे. संभाजीराजे उपोषणाला बसल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी समरजीत घाडगे यांनी संभाजीराजेंची भेट घेतील. त्यानंतर झालेल्या पत्रकारा परिषदेत मराठा समन्वयकांनी सरकारला इशारा दिला.
डॉक्टरांनी संभाजीराजे यांची तपासणी केली आहे, ब्लडप्रेशर लो होत आहे. राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. शिवसेनेचे नेते आले होते, ५ तासात याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले होते मात्र अद्याप काही झाले नाही. उद्यापासून रास्ता रोको चालू होणार आहे त्यावर काय करायचं हे सरकारने ठरवावे. आमचे आंदोलन शांततेचं आहे. राजेंना जर काही झालं तर आम्ही शांत बसणार नाही. सरकारने आज जर दखल घेतली नाही तर आम्ही आक्रमक होऊ, अशा इशारा समन्वयकांनी दिला.
संभाजीराजेंनी केलं आवाहन
मला माहीत नव्हते की, समन्वयक पत्रकार परिषद घेणार आहेत समन्वयकांचा आक्रोश मी समज़ू शकतो. समन्वयकांची भूमिका ही त्यांची आहे. समाजाला वेठीस धरून मला आंदोलन करायचे नाही आहे. तुमच्या भावना एका ठिकाणी आहे आणि ही लोकशाही आहे. आता लोकशाही आहे पहिल्यासारखं नाही, छत्रपतींनी आदेश दिला की झालं सगळं, आता असं नाही. मात्र तुमच्या भावना आहेत शांतता राहावी. आंदोलनाला गालबोट लागू नये' अशी विनंती संभाजीराजेंनी केली.
No comments:
Post a Comment