Friday, February 25, 2022

युक्रेनच्या सैनिकांची शौर्यगाथा ; रशियन सैन्याला रोखण्यासाठी स्वत: ला पुलासोबत उडवलं...

वेध माझा ऑनलाइन - रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये  अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावत आहेत. दहा लाखांहून अधिक लोक युक्रेन सोडून गेले आहेत. त्याच वेळी, राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की यांनी देश सोडून पळून जाण्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आपण युक्रेनमध्ये आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत देशासोबत उभा राहू, असा व्हिडिओ त्याने जारी केला आहे. दरम्यान, युद्धाशी संबंधित काही इमोशनल घटनाही समोर येत आहेत. क्रिमियामध्ये, रशियन सैन्याला रोखण्यासाठी एका युक्रेनच्या सैनिकानं स्वत: ला पुलासोबत उडवलं आहे.

पुलाच्या रक्षणाची होती जबाबदारी

'द सन'च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सैनिकाच्या या शौर्यामुळे रशियन सैन्याच्या ताफ्याला दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पुलावर स्वत:ला उडवणाऱ्या युक्रेनियन सैनिकाचे नाव विटाली शकुनअसे आहे. क्रिमियन सीमेवरील खेरसॉन भागातील हेनिचेस्क पुलाच्या  रक्षणासाठी विटाली शकुन यांना तैनात करण्यात आलं होतं.

जीव धोक्यात आहे याची होती कल्पना

युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफनं आपल्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे की, रशियन सैन्याच्या ताफ्याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पूल उडवणं हा होता आणि त्यामुळे बटालियन पूल उडवणं हा निर्णय घेतला. यानंतर पुलाभोवती स्फोटके पेरण्यात आली, मात्र तेथून बाहेर पडण्यासाठी वेळ इतका कमी होता की, स्फोट झालेल्या जवानाचा मृत्यू निश्चित होता. सर्व काही माहित असताना, विटाली यांनी हे केले आणि देशासाठी आपला जीव दिला.

पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, सैनिक विटाली शकुन यांनी मेसेज पाठवला की ते पूल उडवणार आहे. थोड्या वेळानं प्रचंड स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यांच्या या प्रयत्नानं रशियन सैनिकांचा ताफा तिथेच थांबला. पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी रशियन सैनिकांना खूप संघर्ष करावा लागला.सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, सर्व युक्रेनियन आपल्या देशासाठी कठीण काळात एकत्र उभे आहेत. युक्रेनियन लोक रशियन कब्जा करणाऱ्यांना सर्व दिशांनी चालवत आहेत. विटाली शकुन यांना त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment