Sunday, July 31, 2022

राज्यात साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तास्थापन होताच अनेक निर्णयांचा धडका लावला आहे. त्यातच औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात राज्यात तब्बल साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. औरंगाबाद दौऱ्यातील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या भाषणातून त्यांनी ही घोषणा केली आहे. 

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. दरम्यान शनिवार आणि रविवार असा दोन दिवसीय त्यांचा औरंगाबाद दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी मराठवाडा आणि राज्यातील अनेक विकास कामांच्याबाबतीत घोषणा केल्या. त्यातच राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून त्यानीं याविषयी सुद्धा एक महत्वाची घोषणा केली आहे. 
पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे. शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री यांनी अभिवादन केले. यावेळी तिथे पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक मुलं जमली होती. मुख्यमंत्री येताच तरुणांनी पोलीस भरती अशा घोषणाबाजी करायला सुरवात केली. तरुणांच्या घोषणा ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यात राज्यात साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली. 

आजपासून होणार बदल ; एलपीजी गॅसच्या किमती, बँकिंग प्रणाली, आयकर रिटर्न आणि पीएम किसान इत्यादींचा समावेश ;

वेध माझा ऑनलाइन - प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होत असतात ज्यांचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होत असतो. जुलै महिना संपून आजपासून ऑगस्ट महिना सुरु होत आहे. आजपासून होणाऱ्या बदलांमध्ये एलपीजी गॅसच्या किमती, बँकिंग प्रणाली, आयकर रिटर्न आणि पीएम किसान इत्यादींचा समावेश आहे. तुमच्यासाठी या बदलांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात
महिन्याच्या पहिल्या दिवशी आज व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी आता 1936.50 रुपये मोजावे लागणार आहेत.


बँक ऑफ बडोदाच्या नियमात बदल
बँक ऑफ बडोदाच्या खातेदारांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे. बँक 1 ऑगस्टपासून चेकने पैसे देण्याच्या नियमात बदल करत आहे. हे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जात आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत बँकेला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे द्यावी लागेल.

पीएम किसानचे केवायसी
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या केवायसीसाठी 31 जुलैची वेळ देण्यात आली होती. म्हणजेच महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शेतकरी केवायसी करू शकणार नाहीत. केंद्र सरकारने ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली होती. यापूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मे होती.


ITR वर दंड
ITR भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहेत. यानंतर, 1 ऑगस्टपासून आयटीआर भरण्यावर लेट फी आकारली जाणार आहे. आयकरदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी असल्यास, त्याला विलंब शुल्क म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. जर करदात्याचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

महाराष्ट्रातून शिवसेनाही संपत चालली असून केवळ भाजपच राहणार ; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठं वक्तव्य

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली असताना दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे.  महाराष्ट्रातून शिवसेनाही संपत चालली असून केवळ भाजपच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले. रविवारी पाटणामध्ये भाजपच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बिहारमधील काही जिल्ह्यातील भाजप कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी भाजपची ताकद वाढत असून देशात भाजपच राहणार असल्याचे वक्तव्य केले. नड्डा यांनी म्हटले की, भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजपविरोधात लढण्यासाठी आता कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलाच नाही. काँग्रेस 40 वर्षानंतरही भाजपला आव्हान देऊ शकत नाही असेही नड्डा यांनी म्हटले. पक्षाची विचारधारा मजबूत असून लोक ज्या पक्षात 20 वर्ष राहिलीत, तो पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत, असेही नड्डा यांनी म्हटले. 
काँग्रेस आता देशातून संपत असल्याचे सांगत नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवरही हल्लाबोल केला. भाजपचा लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा घराणेशाहीतला पक्ष आहे. तर, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी दोन हात करत आहोत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष आहे.  महाराष्ट्रातही शिवसेना आता संपत असून पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसदेखील आता बहिण-भावांचा पक्ष झाला असल्याची टीका नड्डा यांनी केली.

ईडी च्या छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली... यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव ;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रात्री उशिरा त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सगळ्याशी एकनाथ शिंदेंचा काय सम्बन्ध ? असा मुद्दा आता पुढे आला आहे

१० लाखांच्या रकमेवर शिंदेंचं नाव
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.
दरम्यान,या रक्कमेवर एकनाथ शिंदे यांचं नाव समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊतांच्या घरात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांच्या नावाने 10 लाखांची रोकड का ठेवण्यात आली होती, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 34 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 0 खटाव 3 कोरेगांव 4 माण 4 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 3 सातारा 13 वाई 1 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 34 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 10 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, July 30, 2022

संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार ; भाजपचा विश्वास ; राऊत ईडीला सहकार्य करत नाहीत म्हणून आता ईडी संजय राऊत यांच्या घरी पोहोचली...

वेध माझा ऑनलाइन - खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राऊत यांच्या घरी ईडी पोहोचल्यानंतर भाजप नेत्यांकडून राऊत यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे. आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे, असं भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार आहे. संजय राऊतांविरोधात मी पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार आहे. आता कारवाई सुरु आहे. संजय राऊतांची धावपळ सुरु होती, आता त्यांना हिशोब द्यायला जावंच लागणार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. 

नेमकं काय पत्राचाळ प्रकरण... 
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 


आनंद दिघे यांच्याबाबत एवढं तुम्हाला माहीत होतं, तर तुम्ही आजपर्यंत गप्प का बसलात? ; आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदेनाच आरोपीच्या पिंजऱ्यात केले उभे...शिंदे सत्तेसाठी खालच्या थराला गेल्याची केली टीका...


वेध माझा ऑनलाइन - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी एक तुफानी भाषण केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत ही वक्तव्य केलं. मी ज्या दिवशी मुलाखत देईल, त्या दिवशी राज्यात राजकीय भूकंप होईल. असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झालं, त्याबाबतही मी लवकरच खुलासा करणार आहे, असेही विधान केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक सणसणीत ट्विट केलं आहे आणि त्यात ट्विटमधून त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. आनंद दिघे यांच्याबाबत एवढं काही घडलं हे तुम्हाला माहीत होतं, तर तुम्ही आजपर्यंत गप्प का बसला? असा थेट सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. त्यावरून आता राज्यातलं राजकारण पुन्हा पेटलं आहे.

केदार दिघे नेमकं काय म्हणाले?
याबाबत ट्विट करत केदार दिघे म्हणतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे

आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस कराड लोकशाही आघाडीच्या कार्यालयात केक कापून केला साजरा. ; आ निलेश लंकेच्या हस्ते कापला केक...

वेध माझा ऑनलाइन - राज्‍याचे माजी सहकार व पणन मंत्री मा.आमदार बाळासाहेब पाटील यांनी सहकारात आदर्शवत काम केले असून, सर्वसामान्य शेतकरी कष्‍टकरी यांच्याहितासाठी सहकार टिकला पाहिजे यासाठी त्‍यांनी काम केले, देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेब यांनी घालून दिलेल्‍या आदर्शानुसार 90 टक्‍के समाजकारण आणि 10 टक्‍के राजकारण सुरू असून, आमदार बाळासाहेब पाटील यांनी जनसामान्यांच्या सेवेत स्‍वतःला वाहून घेतले आहे, असा नेता मिळणे हे कराडकरांचं भाग्‍य असल्‍याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

ते कराड लोकशाही आघाडी कार्यालयात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते.

 आमदार निलेश लंके पुढे म्‍हणाले की, आपला नेता हजर नसतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्‍थित राहून वाढदिवस साजरा करतात, यावरूनच आमदार बाळासाहेब पाटील यांनी पाच वेळा विधानसभा सदस्‍य म्‍हणून जनतेच्या केलेल्‍या सेवेची पोच पावती आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांनी सहकार खात्‍याच्या माध्यमातून सहकाराला योग्‍य दिशा देण्याचे प्रामाणिक कार्य केले, माझ्या पारनेर विधानसभा मतदार संघातील अनेक सहकारी संस्‍थांसाठी मोलाचे सहकार्य कलेले आहे, त्‍यांनी आजवर केलेल्‍या कार्याला सॅल्युट करतो अशा शब्‍दांत त्‍यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याप्रती गौरवोद्गार काढले, आणि त्‍यांना वाढदिवसानिमित्‍त शुभेच्छा दिल्‍या.

यावेळी कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते सौरभ पाटील म्‍हणाले की, आपले नेते माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील हे स्‍वतः आपला वाढदिवस साजरा करीत नाहीत, मात्र कराडकर नागरिकांनी कराड लोकशाही आघाडीच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, या समारंभासाठी कराडसह परिसरातून सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्‍थित राहिले, हे पाहून मन भरून येत आहे. अशा शब्‍दांत त्‍यांनी उपस्‍थितांप्रती ॠण व्यक्‍त केले आणि आमदार बाळासाहेब यांना कराड लोकशाही आघाडीच्यावतीने शुभेच्छा दिल्या.

दरम्‍यान कोवीड काळात कराड नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने अहोरात्र झटून केलेल्‍या कामाबद्दल प्रातिनिधीक स्‍वरूपात स्वच्छता कर्मचार्यांचा सत्‍कार कोरोना योद्धे आमदार निलेश लंके यांच्या हस्‍ते करण्यात आला.

 याप्रसंगी देवराजदादा पाटील, मानसिंगराव जगदाळे, सुभाषराव पाटील (काका), संभाजी सुर्वे, जयवंतराव पाटील, विनायक पावसकर, प्रदिप जाधव, आप्पा माने, धनंजय वळीवडेकर, कमलाकर कांबळे, अतुल शिंदे, बाबासाहेब भोसले, हरिष जोशी, गंगाधर जाधव, इंद्रजीत गुजर, विजय वाटेगांवकर, सतिश पाटील, संजय शिंदे, नंदकुमार बटाणे, शहाजी डूबल, महेश कांबळे, श्री पेढारकर, शिवाजी पवार, सादिक इनामदार, गजानन फल्ले, वैभव हिंगमिरे, सिध्दार्थ थोरवडे, सुभाषराव घोडके, अॅड. मानसिंगराव पाटील, रमेश वायदंडे, दाऊद आंबेकरी, राजेश मेहता, लालासो पाटील (कवठेकर), पै.संजय थोरात, सर्जेराव खंडाईत, सौरभ पाटील (तात्या), रमेश वायदंडे, सुनंदा शिंदे, ओंकार मुळे, गजेंद्र कांबळे, सुहास पवार, मोहसिन आंबेकरी, अॅड.विद्याराणी साळुंखे, श्रीमती सिध्दुताई जाधव, राजेंद्र यादव(आबा), प्रमोद शिंदे, प्रितम यादव, संजय बदियाणी, सतिश, भास्करराव शिंदे, मानसिंगराव जाधव, उदय हिंगमिरे, अनिल शहा, राहूल भोसले(भैय्या), दाऊद सुतार,  अख्तर आंबेकरी, पोपटराव साळुंखे, उध्दवराव फाळके, जयप्रकाश रसाळ, हिंदकेसरी पै.संतोष वेताळ, अविनाश कांबळे, संतोष पाटील, दिलीपराव शिंदे, हणमंतराव पवार, काकासाहेब यादव, स्मिता हुलवान, सागर पाटील, राजेंद्र कांबळे, सौ.संगिता साळुंखे (माई), सागर बर्गे, प्रमोद पवार, प्रमोद पाटील, जयंत बेडेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व सेवक वर्ग, कराड नगरपरिषद आजी-माजी सेवक वर्ग, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब बँक आजी-माजी संचालक व सेवक वर्ग, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब पाणी पुरवठा संचालक व सेवक वर्ग, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना आजी-माजी संचालक व सेवक वर्ग, आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठान स्मारक समितीचे पदाधिकारी, पत्रकार प्रतिनिधी व दुरचित्रवाणी प्रतिनिधी, आदरणीय यशवंतराव चव्हाण पतसंस्था आजी-माजी संचालक व सेवक वर्ग, संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था आजी-माजी संचालक व सेवक वर्ग, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य आजी-माजी पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

 


आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार ; वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार ; एकनाथ शिंदेंचे सुचक्र वक्तव्य...

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे रोज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. तर, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटातूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तुम्ही आमचे आई-बाप का काढता?, सत्तेसाठी विश्वासघात कोणी केला?, असा सवाल उपस्थित करत मलाही आता भूकंप करावा लागेल, असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर देखील भाष्य करणार असल्याचं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज मालेगावमध्ये आहेत. यावेळी सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावं लागेल, असा इशारा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 35 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 4 खंडाळा 3 खटाव 5 कोरेगांव 7 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 2 फलटण 3 सातारा 9 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 35 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 20 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Friday, July 29, 2022

धक्कादायक बातमी ...ठाकरे कुटुंबातील व्यक्ती आता मुख्यमंत्री शिंदेंबरोबर ?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना ही आता थेट घरातूनच फुटताना दिसत आहे. कारण ठाकरे घराण्याचे वंशज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील मुख्य शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. निहार ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे निहार हे लवकरच अधिकृत पाठिंबा जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले दिवंगत चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. 

"मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही चर्चा केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे नक्कीच पुढे घेवून जातील. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे. माझी स्वत:ची लॉ फर्म आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जी काही लीगल मदत लागेल ती मी देईन", अशी प्रतिक्रिया निहार ठाकरे यांनी दिली.

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते राहुल भोसले व मित्रपरिवाराच्या वतीने कराडात रक्तदान शिबिराचे आयोजन ...

वेध माझा ऑनलाइन - आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भोसले व मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात 60 हुन अधिक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला
माजी नगरसेवक ऍड मानसिंग पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले
यावेळी माजी उपनगराध्य व लोकशाही आघाडीचे नेते सुभाषकाका पाटील माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील प्रताप पाटील सागर बर्गे बशीर पठाण यांच्यासह शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
राहुल भोसले मित्रपरिवाराने घेतलेल्या या रक्तदान शिबिराचे संपूर्ण शहर परिसरातून कौतुक होत आहे
राहुल भोसले हे शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर राहुल आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे आज त्यांनी आ बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रकदान शिबीर घेत सामाजिक बांधीलकीचे आणखी एक पाऊल पुढे टाकत आपल्या निष्ठेचाही एक आदर्श पुढे ठेवला आहे त्यांच्या कार्याचे शहरात नेहमीच कौतुक होत असते ते आ बाळासाहेब पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते, समर्थक मानले जातात

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 38 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 27 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 4 खंडाळा 1 खटाव 4 कोरेगांव 7 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 3 सातारा 11 वाई 2 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 5 असे  आज अखेर एकूण 38 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 27 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकते रणजित पाटील (नाना) मित्रपरिवाराच्या वतीने आरोग्य आशा वर्कर्सना साडी वाटप...

वेध माझा ऑनलाइन - आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथील सामाजिक कार्यकते व युवा नेते रणजित पाटील (नाना) मित्रपरिवाराच्या वतीने आरोग्य विभागातील आशा वर्कर्सना साडी वाटप तसेच वही व फुलझाडे वाटप करण्यात आले
रणजित (नाना) पाटील हे शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत आ बाळासाहेब पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू व जवळचे मानले जातात त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख खूप चढता आहे त्यांनी गेल्या कोविड काळात खूप मोठं काम केलं आहे विशेष म्हणजे त्यानी स्वतः रस्त्यावर उतरून आपले काम शहरासमोर दाखवून देत बांधीलकी जपली आहे मागील पूरपरिस्थितीत त्यांनी पूरग्रस्तांना जेवण कपडे ब्लॅंकेट औषधे तसेच जीवनावश्यक अनेक गोष्टी मोफत पुरवल्या आहेत केवळ एक दोन गावात नाही तर अनेक पूरग्रस्त भागात गाड्या पाठवून त्यांनी पदरमोड करून ही मदत पुरवली आहे  प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात त्यांच्यामार्फत शहर व तालुक्यातील गणेश मंडळांना  येथील कृष्णा घाट येथे अनेक वर्षापासून मोफत नाश्ता, जेवणाची सोय करून दिली जात असते आजही ही त्यांची सेवा अखंड सुरू आहे  दरम्यान त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख असाच आणखी उंच ठेवत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिनी आज येथील आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा वर्कर्सना साडी वाटप तसेच वह्या व फुलझाडे वाटप करून अनोखा उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला आहे  त्यांच्या याही उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे माजी सहकार मंत्री तथा माजी. पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने अनोखा उपक्रम राबण्यात आला. कराड ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र.118 तील  २० मुलं आणि १८ मुली अशा एकून ३८ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप कराडनगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आणि लोकशाही आघाडीच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आख्तर आंबेकरी आणि बाळासाहेब पवार यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशमुख मित्र परिवाराने गरजू विद्यार्थ्याना शालेय गणवेश वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे सांगत या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला कराडनगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, आदरणीय पी. डी. पाटील सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब पवार,  माजी नगरसेवक मोहसीन आंबेकरी , भाऊसाहेब पवार , राकेश शहा, भाऊसाहेब शिंदे, आख्तर आंबेकरी, विठठलराव देशमुख, जयंत बेडेकर , मुदस्सर आंबेकरी, निवास पवार, सागर माने, प्रशांत भोसले, रमेश पाटील, अमोल पवार, पत्रकार शुभम मोरे, पत्रकार अमोल टकले, पत्रकार सुहास कांबळे, पत्रकार अभयकुमार देशमुख, सागर पाटसुपे, अंगणवाडी शिक्षिका वंदना पाटसुपे मॅडम, मीना काटवटे मॅडम, कोमल लगाडे मॅडम सुरेखा जाधव मॅडम , सारीका देशमुख, मनीषा पवार , कोमल भिसे, सना मुल्ला, फातीमा मुल्ला, फातीमा मुल्ला, राजश्री येळवार, सावित्री कोळी, कोमल खिल्लारे, ख्वाजाबी रमाजान आदी पालक आणि परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

Thursday, July 28, 2022

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 44 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 6 खंडाळा 1 खटाव 7 कोरेगांव 10 माण 2 महाबळेश्वर 0 पाटण 5 फलटण 2 सातारा 8 वाई 1 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 2 असे  आज अखेर एकूण 44 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 60 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारले ; निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

वेध माझा ऑनलाइन - कुणाच्या हुकुमानुसार ऑर्डर चुकीच्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करत आहात, आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात अवमानाची नोटीस बजावावी अशी तुमची इच्छा आहे का? असं म्हणत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारून काढले आहे.
दरम्यान नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. 

नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारून काढले आहेत.
मे महिन्याच्या आदेशानुसार 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित केल्या जाणार होत्या. ही स्थिती अनेक ऑर्डरमध्ये पुन्हा सांगितली गेली होती. ओबीसी आरक्षणांना परवानगी देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची पुनर्सूचना करू शकत नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की 92 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यात आला आहे परंतु दोन नगरपालिकांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ईसीने म्हटले आहे की, निवडणूक अधिसूचित करण्यात आली होती परंतु पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली असल्याने ते आरक्षणानंतर निवडणुका पुन्हा अधिसूचित करतील, असा युक्तिवादशेखर नाफाडे यांनी केला.
यावर, 'आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे की पावसामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली तर अधिसूचना कायम राहील. हे मान्य नाही. तुम्ही तुमच्या सोयीसाठी आणि कदाचित कोणाच्या तरी हुकुमानुसार आमची ऑर्डर चुकीच्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात अवमानाची नोटीस बजावावी अशी तुमची इच्छा आहे का? असा कडक सवाल कोर्टाने निवडणूक आयोगाला विचारला आहे.
'जेथे निवडणूक कार्यक्रमाची सूचना दिली जाते तेथे कार्यक्रम चालू असणे आवश्यक आहे. पाऊस किंवा पुराच्या चिंतेमुळे निवडणूक आयोग फक्त तारखांमध्ये बदल करू शकते, असं म्हणत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारून काढलं.
नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार आहे.
ओबीसी आरक्षणाला परवानगी नसताना निवडणुकीचे वेळापत्रक आधीच जारी करण्यात आले होते. त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.


Wednesday, July 27, 2022

कराडात पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन केल्या प्रकरणी काँग्रेस आंदोलकांवर कारवाई करा ; कराड शहर भाजपची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी


वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रीय आय काँग्रेस च्या वतीने दि.26 रोजी युवक मोर्चाचे जे आंदोलन झालं त्या आंदोलनांमध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले पंतप्रधान पद हे घटनात्मक व संविधानिक आहे याची जाणीव नसल्याने अशा अवैचारिक आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे  या आंदोलकांवर कायदेशीर  कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी कराड शहर च्या वतीने कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस वरिष्ठ निरीक्षक बी आर पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी प्रदेश सचिव विक्रमजी पावसकर, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर , प्रशांत कुलकर्णी,विवेक भासले , प्रमोद शिंदे, धनंजय खोत, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष नितीन शहा, अल्पसंख्यांक युवा मोर्चा प्रदेश चे उपाध्यक्ष,  कामगार आघाडीचे  अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे, नितीन वास्के , धनंजय खोत, रुपेंद्र कदम, कृष्णा चौगुले, शैलेंद्र गोंदकर, शंकर पाटील,विवेक  भोसले, कराड उत्तर महिला आघाडी  नम्रता कुलकर्णी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यशवन्त विकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करणार ; राजेंद्रसिह यादव यांची माहिती...पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे येणार कराडला...

वेध माझा ऑनलाइन - कराड शहराच्या विविध विकास योजनांवर चर्चा करणेसाठी पालिकेतील सत्तारुढ यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व गटनेते नगरसेवक राजेंद्रसिह यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी कराड शहराच्या विकास कामात शासन खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
सुधीर एकांडे,सचिन पाटील यांची यावेळी उपस्थिती होती...
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे कराडला लवकरच येणार आहेत त्यावेळी त्यांचा भव्य नागरी सत्कार करणार असल्याचे गटनेते राजेंद्रसिह यादव म्हणाले आहेत
राजेंद्रसिह यादव यांनी त्यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल यथोचित सत्कार करुन कराडला भेट देण्याची विनंती केली ती त्यांनी तत्काळ मान्य करुन मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यावर पुढील आठवड्यात मी प्रथमच सातारा जिल्हा दौर्‍यावर येत असुन या दौर्‍यातच मी कराडला येणार असे आश्वासन दिले. 
यानिमित्ताने कराडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करणार असल्याचे गटनेते राजेंद्रसिह यादव म्हणाले
राजेंद्रसिह यादव यांनी आपल्या सत्तेच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची माहीती दिली विशेषत स्वच्छ सर्वेक्षण मधे सातत्याने देश पातळीवर झालेल्या गौरवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करुन कराड नगर परिषदेने योग्य नियोजनाने केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच कराड शहराच्या नियोजित विकास कामांची सविस्तर माहीती मुख्यमंत्र्यांना दिली त्यांनीही लक्षपुर्वक समजुन घेवुन काही उपयुक्त सुचना देवुन कराड शहराच्या विकास कामात शासन तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहील याची ग्वाही दिली.
यावेळी राजेंद्रसिह यादव यांनी त्यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल यथोचित सत्कार करुन कराडला भेट देण्याची विनंती केली ती त्यांनी तत्काळ मान्य करुन मुख्यमंत्री पदाची जराबदारी स्विकारल्यावर पुढील आठवड्यात मी प्रथमच सातारा जिल्हा दौर्‍यावर येत असुन या दौर्‍यातच मी कराडला येणार असे अश्वासन दिले.

Tuesday, July 26, 2022

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा मान राखत दिल्या शुभेच्छा...कशा दिल्या शुभेच्छा?वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय घडले याचा नेम आता उरला नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळत शुभेच्छा दिल्यात. फडणवीस यांनीही हीच रिघ ओढवली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा मान राखत शुभेच्छा दिल्या आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यानंतर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 'माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो' अशा शुभेच्छा दिल्या आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळला आहे.
पण, महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचा सन्मान करत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री . उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ठाकरे यांना निरोगी दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना,अशा शब्दांत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पक्षप्रमुख उल्लेख टाळला ; कशा भाषेत दिल्या शुभेच्छा...?

वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या महामुलाखतीतून शिंदे गट, बंडखोर आमदार आणि भाजपवर टीका करत आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नसून तर माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, अशी भावना व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे

सोनिया गांधी यांची आज ईडी कडून सहा तास चौकशी ;

  वेध माझा ऑनलाइन - सोनिया गांधीं आज दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. सहा तासांनंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या.

सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी सकाळी 11 वाजता दिल्लीतील अब्दुल कलाम रोडवरील ईडी कार्यालयात पोहचल्या. त्यानंतर अर्ध्या तासासाठी दुपारच्या जेवणाकरता घरी गेल्या आणि पुन्हा साडे तीन वाजता पुन्हा आल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, . प्रियंका गांधी यांना ईडीच्या मुख्यालयात थांबण्यास परवानगी दिली. कारण सोनिया गांधी यांना वेळेवर औषधे देता येतील. प्रियंका गांधी यांना सोनिया गांधी यांच्या खोलीपासून दूर ठेवण्यात आले होते.
सोनिया गांधी यांची  पहिल्यांदा 21 जुलैला दोन तास ईडीने चौकशी केली. त्यावेळी त्यांना 28 प्रश्न विचारण्यात आले होते. नॅशनल हेराल्डप्रकरणी  ईडी चौकशी करत आहे. याच प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीने 50 तास चौकशी केली.

राज्यात मध्यावती निवडणुका होतील ; आ पृथ्वीराज चव्हाण यांचे कराडच्या पत्रकार परिषदेत भाकीत ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यातील सध्याचे दोन जणांचे सरकार हे कायद्याने असंवैधानिक आहे किमान 12 जणांचा मंत्री म्हणून शपथ होणे गरजेचे असताना तसे अद्यापतरी झालेले नाही मंत्रीमंडळ तयार करताना शिंदेंचा चेहरा पुढे करून भाजपचा अधिक मंत्रीपदे मिळण्यासाठी प्रयत्न होताना दिसतो आहे... मात्र त्यामुळे होणाऱ्या नाराजीच्या पेचामुळे पुन्हा राज्यात मध्यावती निवडणुका होतील...असे भाकीत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले... 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या होणाऱ्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या इडी चौकशीचा निषेध नोंदवण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने कराड येथे मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ पृथ्वीराज चव्हाण बोलत होते

आ चव्हाण पुढे म्हणाले, राज्यातील सध्याच्या चालू राजकिय घडामोडीतुन शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्यासाठी भाजप कडून प्रयत्न होताना दिसत आहे... की ज्यामुळे हिंदू मतांचे शिवसेना-आणि भाजप असे होणारे विभाजन थांबून फक्त भाजपलाच एकगठ्ठा ते मतदान होईल... हा त्यामागे हेतू असल्याचे दिसते... दरम्यान,उद्धव ठाकरे यांनी फ्लोरिंग टेस्ट द्यावी असे माझे व्यक्तिगत मत होते...कारण त्यामुळे सर्व बाबी सगळ्यांसमोर आल्या असत्या...आणि त्याचे सम्पूर्ण रेकॉर्ड सभागृहात नोंद झाले असते असेही ते म्हणाले...
ईडी चा गैरवापर व भीती दाखवून हे सरकार काँग्रेससह इतर विरोधक आमदारांना धाक दाखवत आहे असे सांगत काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादीतून यापुढेही भाजपमध्ये आमदारांचे आऊट गोइंग चालू राहील की काय... अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली...
आमच्या काळात आम्ही 10 वर्षात एकूण 28 ईडी च्या कारवाया केल्या... तर भाजपने 8 वर्षात 2900 कारवाया करत या यंत्रणेचा हुकूमशहा पद्धतीने गैरवापर केला... मोदींना रशिया व चीन या देशात जशी एकपक्षीय लोकशाही आहे तशी भारत देशात हवी आहे आणि मोदींची त्याच दिशेने पावले पडत आहेत... असेही ते म्हणाले.
विधान परिषदेला काँग्रेसची जी 7 मते फुटली  त्याबद्दल पक्षीय स्तरावर निर्णय होईलच आपण त्याबाबतच्या सर्व बाबी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत...
काँग्रेसचे आमदार हंडोरे हे एकनाथ शिंदें यांच्या संपर्कात असल्याबद्दल त्यांना विचारले असता... या बातम्या केवळ वर्तमानपत्रातील आहेत... असे उत्तर देत त्यांनी पत्रकार परिषद संपवली...

दरम्यान आ चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत या सरकारने देशाला मोठया प्रमाणात कर्जबाजारी केल्याचे सांगितले... देशातील शासकीय प्रोजेक्ट खासगीकरण करण्याकडे या सरकारचा असणारा कल भविष्यात धोकादायक असल्याचेही ते म्हणाले... त्यासाठी देशातील रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी उदाहरण दिले... देशातील महागाई बेरोजगारी, आर्थिक मागासलेपणा अशा अनेक बाबींचा उहापोह करत आ चव्हाण यांनी मोदी सरकारवर अक्षरशः  टीकेची चौफेर झोड उठवली... 


आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 47 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 7 खंडाळा 2 खटाव 2 कोरेगांव 14 माण3 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 4 सातारा 10 वाई 0 व इतर 2
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 47 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 53 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली,पूर्ण विश्वास टाकला त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात ; मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केले मोठे गौप्यस्फोट...

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेमध्ये अचानक झालेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठा स्फोट झाला. रातोरात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं. मात्र, हे सगळं एका रात्रीत घडलं नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबद्दल संजय राऊत यांच्यासोबतच्या मुलाखतीत खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता, असं यात म्हटलं आहे.शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात.
असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे

उद्धव ठाकरे म्हणाले, की खूप वेदनादायी आहे तो प्रकार. मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं…
सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार?… तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती.
ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात...असेही ते या मुलाखतीत म्हणाले आहेत
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला आता तेच आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवत आहेत. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिल हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोक घडवण्याची वेळ आली आहे. ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये तुम्ही विश्वासघातकी आहात असंही ते म्हणाले आहेत

Monday, July 25, 2022

आधारकार्ड संबंधित महत्वाची ही माहिती तुम्हाला माहीत आहे का?...माहीत असणे गरजेचे आहे...बातमी पहा...

वेध माझा ऑनलाइन - मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने उपाययोजना केली असून यापूर्वी वर्षातून एकदा मतदार नोंदणी केली जायची. तथापि आता भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी ही वर्षातून 4 वेळा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. 

आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्र. 6ब हा फार्म भरायचा आहे. हा अर्ज सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये, भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (https://eci.gov.in/) आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ (https://ceo.maharashtra.gov.in/) येथे उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे 6ब अर्ज National Voter Service Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline APP यावरही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असेल. यावरून अर्ज क्र. 6ब हे आधार कार्ड संलग्न करून स्व-प्रमाणित करता येईल. हा अर्ज भरताना मतदाराला आधार कार्डाला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. मात्र याप्रकारे संलग्नीकरण शक्य झाले नाही किंवा स्व-प्रमाणित करावयाचे नसल्यास, तर केवळ आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करून स्व-प्रमाणित न करता मतदाराला स्वतःच्या मतदार ओळखपत्र आधारशी संलग्न करता येईल. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र. 6ब भरून घेतील आणि त्यांचे संगणकीकरण केले जाईल. या मोहिमे अंतर्गत निवडणूक कार्यालयांकडून राज्यव्यापी विशेष शिबिरांचे आयोजनही केले जाणार असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.
मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यांच्या संलग्नीकरणामुळे मतदारांच्या ओळखीचे प्रमाणीकरण, मतदारांच्या एकापेक्षा अधिक नोंदींची वगळणी, निवडणूक मतदानासंबंधीची विद्यमान माहिती व आयोगाकडून वेळोवेळी प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला मोबाइलद्वारे अवगत करणे, हे उद्देश साध्य होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आधार क्रमांक संलग्न करणे ऐच्छिक आहे. त्यामुळे मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या 11 पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.
आधार क्रमांक सादर करता आला नाही  निकषावर मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचे नाव वगळले जाणार नाही. तसेच आधार क्रमांक नमूद केलेले प्रत्यक्ष आणि संगणककृत दस्तावेज दुहेरी कुलूपबंद ठेवले जातील आणि आधार क्रमांकाची गोपनीयता अवाधित ठेवण्यासाठी आधार कार्डावरील क्रमांक लपविण्याची तरतूद केली असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.
000

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 10 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 37 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 0 खटाव 0कोरेगांव 0 माण 1महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 4 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 3 असे  आज अखेर एकूण 10 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 37 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Sunday, July 24, 2022

सातारा जिल्ह्याचे आजचे कोरोना रिपोर्ट्स ...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 30 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 11 खंडाळा 2 खटाव 1 कोरेगांव 0 माण 2 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 3 सातारा 9 वाई 0 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 30 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  13  जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, July 23, 2022

भाजप नेते नितीन गडकरी राजकारण सोडणार ? त्यांनी स्वतः व्यक्त केली इच्छा ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही वर्षांपासून राजकारणाचा स्तर घसरत चालल्याच दिसत
आहे. अगदी ग्रापंचायतपासून खासदार होण्यापर्यंत पाण्यासारखा पैसा ओतला जात आहे. मतदार ते आमदार, खासदार फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचेही चित्र आहे. नुकतेच महाराष्ट्रात झालेल्या संत्तातरातही घोडेबाजार झाल्याचे आरोप होत आहे. मात्र, यावर आता खुद्ध केंद्रीय मंत्र्यांनीच भाष्य केल्याने या गोष्टीला महत्त्व प्राप्त झालं आहे. हे केंद्रीय मंत्री दुसरे तिसरे नसून नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात थेट राजकारण सोडण्याची भाषा केली आहे. 

काय म्हणाले नितीन गडकरी?
सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्यायची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रश्न उपस्थित केले. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतो असे वाटायला लागले, असे मत केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी भाषणातून व्यक्त केली. ते ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे बोलत होते.

एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत ; फडणवीसांची सारवासारव...

वेध माझा ऑनलाइन -  मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले त्यानंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत.  चंद्रकात पाटलांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे म्हणत, फडणवीसांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन भाजप नेत्यांना सल्ला दिला आहे. अनेकजण अनुभवी, पण संधी काहींनाच मिळू शकेल असं विधान फडणवीसांनी केलंय यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा जे म्हणाले... त्यावर वेगळे अर्थ काढले... माध्यमांचे ते काम असते...  हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल आणि पुढे देखील येईल.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं 2019 च्या निवडणुकीआधीच ठरलं होतं तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं अचानक नव्हे तर आधीच ठरलं होतं,  असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकार आल्यानंतर आपल्या अपेक्षा वाढतात मात्र आपल्याला त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचे आहे.  पुढच्या अडीच वर्षात कमी अपेक्षा ठेवून एक भव्य सरकार आणू. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत पण सगळ्याच समाधान होऊ शकत नाही.  सर्व नियमांचा विचार करावा लागेल. काही जागा शिवसेनेला द्याव्या लागतील. एकावेळी सर्वांना सर्व गोष्टी देता येत नाही. कुणी नाराज होण्याचे कारण नाही, नाराजी येईल पण आपण ती दूर केली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

आजचे सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 48 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 21 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 9 खंडाळा 2 खटाव 4 कोरेगांव 5 माण 5 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 4 सातारा 14 वाई 0 व इतर 4
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 21 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

भाजपच्या बैठकीत चंद्रकांत दादांचे वादग्रस्त विधान ; म्हणाले... आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले...

वेध माझा ऑनलाइन - भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सध्या पनवेलमध्ये सुरू आहे. दरम्यान, या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे भाजपासोबत सरकार स्थापन करणारा शिंदे गटही नाराज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंद्रकांतदादांच्या या विधानाची गंभीर दखल घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशांमुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. मात्र आपण हे दु:ख पचवून पुढे गेलो, कारण आपल्याला पुढे जायचं होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच सर्वच स्तरामधून टीका झाल्यानंतर भाजपच्या दिल्लीतीत पक्षश्रेष्ठींनीही त्याची गंभीर दखल घेतली असून, या भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.

Friday, July 22, 2022

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद ; जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली वेळ ...काय आहे प्रकरण?

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील हे त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे प्रचलित आहेत. त्यांनी आपल्या विरोधकांवरदेखील फार टोकाची टीका केली असेल असं क्वचितच घडलं असेल. पण शांत आणि संयमी जंयत पाटील यांना आज अखेर कोर्टाची पायरी चढावी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात एका प्रकरणी इस्लामपूर न्यायालयाने वॉरंट काढलं होतं. त्यामुळे पाटील यांना आज कोर्टात हजर राहावं लागलं.

नेमकं प्रकरण काय ?
जयंत पाटील यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही ते न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यात आले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.

कोरोनासह राज्यात स्वाईन फ्लूच्या प्रकरणात झपाट्याने वाढ ; राज्यात आतापर्यंत एकूण 142 प्रकरणांची नोंद ; धक्कादायक म्हणजे दोन आठवड्यांतच स्वाईन फ्लूने 7 बळी...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - कोरोना पुन्हा थैमान घालतो आहे. दिवसेंदिवस प्रकरणं वाढत आहेत. त्यात भारतात मंकीपॉक्सनेही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. अशात महाराष्ट्रावर आणखी एक संकट ओढावलं आहे. कोरोनासह राज्यात आणखी एका व्हायरसचा प्रकोप झाला आहे. हा व्हायरस म्हणजे H1N1 अर्थात स्वाईन फ्लू.

या वर्षात स्वाईन फ्लूच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 142 प्रकरणांची नोंद झाली. त्यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.10 जुलैला पालघरमध्ये स्वाईन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी गेल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर आता एकूण 7 मृत्यूंची नोंद झाली आहे.
स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुण्यात आहेत. त्यानंतर पालघर, नाशिक, कोल्हापूर, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नागपूर महापालिकेतही रुग्ण आढळले आहेत.

आज कराडातील कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 56नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 17 खंडाळा 4 खटाव 5 कोरेगांव 1 माण 3 महाबळेश्वर 0 पाटण 3 फलटण 9 सातारा 10 वाई 1 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 3 असे  आज अखेर एकूण 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 50 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कोयना परिसरात भूकंप ; वाचा बातमी..

वेध माझा ऑनलाइन  -  कोयना परिसरात भूकंपाचा   सौम्य धक्का बसला आहे.  आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा धक्का बसला असून याची तीव्रता 3.0 रिश्टर   असल्याची माहिती उपकरण उपविभाग, कोयना नगर  उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.
या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावाच्या नैऋतेस 7.0 कि.मी अंतरावर आहे.
0000

Thursday, July 21, 2022

आदित्य ठाकरे यांची सकाळी शिवसैनिकांसमोर सभा , त्याच ठिकाणचे शिवसैनिक संध्याकाळी शिंदे गटात सामील

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही सक्रीय झाले आहेत. मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांनी सकाळी ज्या ठिकाणी सभा घेतली, त्याच ठिकाणच्या शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे भिवंडीत पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी चर्चा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे.

बंडखोरांना पाडण्यासाठी शरद पवारांचा गेम प्लॅन ; हसन मुश्रीफ याना फोन करून सांगितले...आता लोकसभेसाठी तयारी करा

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत शिवसेनेच्या 12 खासदारांनी बंडखोरी केली. दरम्यान या 12 खासदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसनेचे खासदार शिंदे गटात गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये खासदार कोण ही चर्चा रंगली आहे. खासदार संजय मंडलीक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी केलेल्या बंडखोरीने जिल्ह्यातील राजकारण नव्या वळणावर आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना फोन करून लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने त्यांनी महाविकास आघाडीतून फारकत घेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. दरम्यान कोल्हापूर हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोन्ही मतदार संघावर नजर ठेवून असणार आहेत. यासाठी ते आतापासूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यासाठी शरद पवारांनी थेट हसन मुश्रीफ यांना फोन करत तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला नवीन उमेदवारांची तयारी केली पहिजे. त्यासाठी आता आपण लक्ष घालावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांना फोवरून दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभेची निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही; परंतु पक्षाने आदेश दिल्यास तो आपण नाकारू शकत नाही, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती ई डी कडून जप्त

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यातआली आहे.

याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक आणि आता प्रफुल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीची कारवाई होणारे पटेल तिसरे नेते ठरणार आहे.
इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात आली आहे.

ओ बी सी समाजाला आरक्षण मिळाले ; कराड शहर भाजपच्या वतीने साखर आणि पेढे वाटून आनंद व्यक्त...

वेध माझा ऑनलाइन - ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याच्या निमित्ताने येथील कराड शहर भाजपच्या वतीने पेढे व साखर वाटून आज येथील दत्त चौक येथे आनंद व्यक्त  करण्यात आला  

सध्याच्या राज्य सरकारने नुकतेच ओ बी सी समाजाला आरक्षण जाहीर करत आपला दिलेला शब्द पाळला आहे मागील आघाडी सरकारच्या काळात विरोधात असताना भाजपने obc ना आरक्षण देण्याबाबत मागणी केली होती 
 त्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत झालेल्या सत्ताबदलानंतर सध्या राज्यात स्थापन झालेल्या  शिंदे - फडणवीस सरकारने सत्तेत येताच प्रथमतः obc आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे राज्यात obc ना आरक्षण मिळाले त्यानिमित्ताने समस्त obc समाजात उत्साहाचे वातावरण पसरले आहे कराड मध्ये देखील  भाजपा च्या वतीने आनंद व्यक्त करताना आज येथील दत्त चौकात साखर वाटप करून obc समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला
यावेळी  कराड  शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक घनश्याम पेंढारकर, नितीन वास्के, सरचिटणीस प्रमोद शिंदे, श्री.मुकुंद चरेगावकर,सातारा जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, महिला आघाडीचे अध्यक्ष सीमाताई घाडगे, सौ धनश्री रोकडे, obc अध्यक्ष सुनील नाकोड, ,अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नितीन शहा, माणशिंग कदम,अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष सागर लादे, उपाध्यक्ष विवेक भोसले, नितीन भोसले, कामगार आघाडीचे अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे, अभिषेक कारंडे, रुपेंद्र कदम, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेंद्र गोंदकर,  अल्पसंख्यांक आघाडीचे निखिल शहा, किसन चौगुले ,त्याच बरोबर इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

कृष्णा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध निवड...व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची निवड

वेध माझा ऑनलाइन -  रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला कृष्णाकाठची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुवर्णमहोत्सवी वर्षे पूर्ण केलेल्या या बँकेच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. आज झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत कराड तालुका सहकारी संस्थांचे उपनिबंधक संदीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी डॉ. अतुल भोसले यांची चेअरमनपदी; तर दामाजी मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे व संचालकांचे अभिनंदन करून, नूतन संचालक मंडळाने सभासदांचा विश्वास सार्थ ठरवत बँकेला प्रगतीपथावर न्यावे, असे आवाहन केले. 

दरम्यान, यावेळी पत्रकारांशी संवाद साधनाता डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेने स्थापनेपासूनच ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी व गोरगरीबांना अर्थसहाय्य केले आहे. डॉ. सुरेशबाबांनी बँकेला संघर्षाच्या काळात टिकवून ठेवण्याचे महत्वाचे काम केले. या संघर्षातून वाटचाल करत बँकेने आजची ही प्रगती साधली आहे. २००३ साली चेअरमनपदाची संधी मिळाल्यानंतर संचालक मंडळाच्या सहकार्याने मला बँकेचा विस्तार करता आला. गेल्या १० वर्षात बँकेचा एन.पी.ए. शून्य टक्के राहिला असून, बँकेला आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आर्थिक संस्था म्हणून ओळखले जाते. तसेच बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १८.५३ टक्के इतके आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा ४ जिल्ह्यात बँकेचे कार्यक्षेत्र पसरले असून, लवकरच राज्यभर कार्यक्षेत्र मिळावे, अशी आम्ही मागणी केली आहे. बँकेला विविध संस्थांकडून गेल्या अनेक वर्षात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ३० जूनअखेर बँकेचा एकूण व्यवसाय ७७१ कोटींहून अधिक झाला असून, मार्च २०२३ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय १००० कोटीपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सर्व संचालकांनी व सभासदांनी चेअरमनपदाची पुन्हा संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

यावेळी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात यांची सातारा जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपनिबंधक कार्यालयातील मुख्यम लिपिक एफ. एस. गावित, बँकेचे नूतन संचालक शिवाजी पाटील, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, गिरीश शहा, रणजीत लाड, प्रदीप थोरात, नामदेव कदम, विजय जगताप, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, अनिल बनसोडे, संतोष पाटील, नारायण शिंगाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, भगवान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे रणजित (नाना)पाटील यांचा वाढदिवस दणक्यात साजरा ; मान्यवरांनी दिले शुभेच्छा व आशीर्वाद...

वेध माझा ऑनलाइन - कराड शहरातील सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे युवा नेते रणजित पाटील(नाना) यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक मान्यवर मंडळींनी त्यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीसाठी  शुभचिंतन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

रणजित (नाना) पाटील हे शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत आ बाळासाहेब पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते अत्यंत विश्वासू व जवळचे मानले जातात त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख खूप चढता आहे त्यांनी गेल्या कोविड काळात खूप मोठं काम केलं आहे विशेष म्हणजे त्यानी स्वतः रस्त्यावर उतरून आपले काम शहरासमोर दाखवून देत बांधीलकी जपली आहे मागील पूरपरिस्थितीत त्यांनी पूरग्रस्तांना जेवण खाण कपडे ब्लॅंकेट तसेच जीवनावश्यक अनेक गोष्टी मोफत पुरवल्या आहेत केवळ एक दोन गावात नाही तर अनेक पूरग्रस्त भागात गाड्या पाठवून त्यांनी पदरमोड करून ही मदत पुरवली आहे 

प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात त्यांच्यामार्फत शहर व तालुक्यातील गणेश मंडळांना  येथील कृष्णा घाट येथे अनेक वर्षापासून मोफत नाश्ता, जेवणाची सोय करून दिली जात असते आजही ही त्यांची सेवा अखंड सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोर्चाच्या माध्यमातून त्यांचा सहभाग नोंद घेण्यासारखा राहिला आहे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभा करण्यासाठी त्यांची अनेक सहकाऱ्यांच्या साथीने धडपड  सुरू आहे त्यासाठी म्हणून त्यांचे आवश्यक ते जोरदार प्रयत्न सुरू आहेत ते कट्टर हिंदुत्ववादी व शिवभक्त आहेत अशीही त्यांची ओळख आहे

दरम्यान या वाढदिवसानिमित्त रणजित पाटील मित्रपरिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, मोफत शालेय वह्या वाटप मोफत बूस्टर डोस तसेच फुलझाडांच्या रोपांचे वाटप व मोफत अपघात विमा अशा समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील हजारो जणांनी याचा लाभ घेतला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आमदार बाळासाहेब पाटील आ पृथ्वीराज चव्हाण श्री छ खासदार उदयनराजे भोसले डॉ अतुल भोसले ऍड उदयसिह पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिनी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील  मान्यवरांनीदेखील त्यांना अनेक शुभेच्छा देत आशीर्वाद दिले

आजचे सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 33 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 45 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 0 खटाव 4 कोरेगांव 5 माण 2 महाबळेश्वर 1 पाटण 0 फलटण 2 सातारा 12 वाई 2 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 33 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 45 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Wednesday, July 20, 2022

कराडमध्ये रुग्णसंख्या जवळजवळ कालच्या इतकीच... जिल्ह्यातील कोरोना स्थिती पहा...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 38 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 46 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 6  खंडाळा 1 खटाव 8 कोरेगांव 2 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 4 सातारा 11 वाई 4 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 38 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 46 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Tuesday, July 19, 2022

शिंदेंनी दिले निवडणुक आयोगाला पत्र ; आयोगाने मान्यता दिली तर शिवसेना शिंदेंची !

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पण, शिवसेना कुणाची हा प्रश्न उपस्थितीत झाला असून आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणीच्या आधीच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पत्र आयोगाला देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनाच काबीज करण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडून वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. मात्र,सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी शिंदे यांच्या गटाची निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी निवडल्याची माहितीच आयोगाला देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जर मान्यता दिली तर शिवसेनाही शिंदेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्याची शेवटची लढाई सुरू केली आहे.

संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू ; मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक हादरा देण्याची तयारी केलेली आहे. संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याचीही मागणी खासदारांनी केली आहे. आमच्याकडे दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत गटनेते पदावरही शिंदे गटाने दावा केला आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात आलं तेव्हाही अशाच चर्चा झाल्या होत्या. दोन दिवसांच्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आलं होतं.
लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन शिवसेनेचे 12 खासदार दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. या भेटीचा पहिला फोटो समोर आला. शिंदेंना भेटायला गेलेल्या खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे, भावना गवळी, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे यांच्यासह 12 खासदारांचा समावेश होता.

सातारा जिल्ह्याचे आजचे कोरोना रिपोर्ट्स...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे तर 56 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 8  खंडाळा 1 खटाव 0 कोरेगांव 7 माण 4 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 4 सातारा 7 वाई 6 व इतर 0
3 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 56 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

सौ अंजली पेंढारकर - फाटक यांचे सी ए परीक्षेत नेत्रदीपक यश ; सर्वच स्तरातून त्यांचे होतय अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन - भाजपचे माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांची पुतणी व सौ अपर्णा दुर्गाप्रसाद पेंढारकर यांची कन्या सौ अंजली पेंढारकर - फाटक यांनी नुकत्याच  झालेल्या सी ए  परिक्षेत घवघवीत यश संपादन करून सातारा जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने येण्याचा बहुमान पटकावला त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदन होत आहे.

अंजली पेंढारकर- फाटक यांचे शालेय शिक्षण येथील कन्या शाळा येथे पूर्ण झाले. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन बी. कॉम पर्यंतचे शिक्षण पुणे येथील गरवारे कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केले. पुढील CA  शिक्षणासाठीचे मार्गदर्शन त्यांनी UNACADEMY पुणे येथून घेतले आहे

एकनाथ शिंदे अचानक रात्रौ 12 च्या दरम्यान दिल्लीत दाखल ; पहिल्यांदाच फडणवीस यांना बरोबर न घेता आले दिल्लीत... काय आहे कारण?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे आमदारांना फोडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदारांनाही आपल्या गटात सामील करण्याच्या तयारीत आहे. मध्यरात्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या वेळी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना वगळून दिल्लीत दाखल झाले आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्ली दौऱ्यावर पोहोचले आहे. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या दौऱ्यात शिंदे हे देशाचे महाधिवक्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळली आहे. त्याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयात येत्या 20 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्णय देते, त्यानंतर काय भूमिका मांडली पाहिजे, याची चर्चा या भेटीदरम्यान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांचा 15 दिवसांतला हा दुसरा दौरा आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच फडणवीस यांच्यासह न येता एकटेच आले आहे. 

सौरवादळ आज पृथ्वीला धडकणार ; सॅटेलाईट, वीज, जीपीएस, रेडिओ, मोबाईल नेटवर्क अशा विविध गोष्टींवर होऊ शकतो; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - सूर्याच्या पृष्ठभागावर कायम मोठे मोठे स्फोट होत असतात. परिणामी सूर्यातून मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर फेकली जातात, ज्याचा संपूर्ण सूर्यमालेवर प्रभाव पडतो. या रेडिएशनमुळे येणाऱ्या वादळाला सौरवादळ किंवा जिओमॅग्नेटिक स्टॉर्म म्हणूनही ओळखलं जातं. यामुळे भरपूर उष्णता वाढते, तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, असंच एक सौरवादळ आज (19 जुलै) पृथ्वीला धडकणार आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अंतराळ हवामान अभ्यासक आणि फिजिसिस्ट डॉ. तमिथा स्कोव यांनी याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी सांगितलं आहे, की लवकरच ‘लांब सापासारख्या सोलर फ्लेअर्स पृथ्वीला धडकतील’. नासानेदेखील यापूर्वीच 19 जुलैला हे सौरवादळ पृथ्वीला धडकू शकतं असा अंदाज वर्तवला होता. याचा परिणाम सॅटेलाईट, वीज, जीपीएस, रेडिओ, मोबाईल नेटवर्क अशा विविध गोष्टींवर होऊ शकतो.













या गोष्टींवर होणार परिणाम

सौरवादळामुळे पृथ्वीवरील उंच भागातील वीज जाण्याचा धोका (Blackout) वर्तवण्यात येत आहे. सोबतच, रेडिओ सिग्नलवरही (Radio signal) याचा परिणाम होईल. पृथ्वीच्या वातावरणातील सगळ्यात वरच्या थरात असलेल्या कृत्रिम उपग्रहांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. तसेच, जीपीएस (GPS) आणि मोबाईल सिग्नलवरही (Mobile Signal) याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पृथ्वीवर ठिकठिकाणी ब्लॅकआऊट होऊन, बऱ्याच क्षेत्रांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

Monday, July 18, 2022

आता होणार 4 दिवसाचा आठवडा...

वेध माझा ऑनलाईन - केंद्र सरकारचा नवीन वेज कोड म्हणजेच कामगार कायदा 1 जुलै 22 पासून लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण काही कारणास्तव तो लागू करण्यात आला नाही. या कायद्यामुळे नोकरदारांच्या पगार, सुट्ट्या, पीएफ, कामाचे तास या सर्व गोष्टींमध्ये बदल होतील. तसंच चार दिवसांचा आठवडा व तीन दिवस सुट्टी हा महत्त्वाचा बदल या कायद्यामुळे होणार आहे. हा कायदा कधी लागू होईल, याबद्दल कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, नवीन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही डेडलाईन निश्चित केलेली नाही. रामेश्वर तेली म्हणाले की, बहुसंख्य राज्यांनी चार लेबर कोडवरील मसुदा केंद्राकडे पाठवला आहे. नवीन कामगार संहिता 1 जुलैपासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु काही राज्यांकडून कोडमधील ड्राफ्ट कमेंट्स येणे बाकी आहे. आतापर्यंत, एकूण 31 राज्यांनी नवीन वेज कोडवर ड्राफ्ट नियम पाठवले आहेत.नवीन लेबर कोड वेज सोशल सिक्युरिटी, इंडस्ट्रीयल रिलेशन्स आणि ऑक्युपेशनल सेफ्टी  यांच्याशी संबंधित आहेत. या लेबर कोडमुळे पगारदारांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन कोड लागू झाल्यानंतर, साप्ताहिक सुट्ट्यांपासून ते हातात येणाऱ्या पगारातही बदल होईल.

...तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करणार ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी निवेदनाद्वारे दिला कराड पालिका प्रशासनाला इशारा...


वेध माझा ऑनलाइन - 
 
कराड नगरपालिका प्रशासनाने शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी मंडई परिसरात शेतकरी झोन तयार करावे त्या झोन मध्ये फक्त शेतकरी बसतील व्यापार्यांंना बसण्यास मनाई करावी तसे न झाल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

निवेदनात सुतार म्हणतात.....
शेतकऱ्यांच्या व्यथा सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत कधी निसर्ग निर्मित संकटामुळे तर कधी मानवनिर्मित संकटामुळे शेतकरी अडचणीत  आहे, शेतकरी शेतामध्ये भाजीपाला पिकवून आपला दैनंदिन खर्च भागवत असतो कराड टाऊन हॉल परिसरामध्ये आपला भाजीपाला विकण्यास बसलेल्या शेतकऱ्यांना बसलेल्या जागेवरून हाटकले जाते मुळात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला शेतातून आणायला साधारण तीन ते चार वाजतात त्यानंतर शेतकऱ्यांना भाजी विकण्यास जागा उपलब्ध होत नाही, स्थानिक व्यापारी महत्वाच्या जागेवर बसतात त्यामुळे शेतकऱ्यांना जागा मिळेल तेथे रस्त्यावर बसावे लागते यासाठी कराड नगरपालिका प्रशासनाने शेतकऱ्यांना भाजीपाला विकण्यासाठी मंडई परिसरात शेतकरी झोन तयार करावे त्या झोन मध्ये फक्त शेतकरी बसतील व्यापार्यांंना बसण्यास मनाई करावी तसे न झाल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
यावेळी समीरभाई कुडची, सुरज जाधव, शोयब संदे आदी उपस्थित होते.

आज जिल्ह्यातील कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 17 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 52 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2  खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 2 फलटण 4 सातारा 6 वाई 2 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 17 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 52 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

धक्कादायक बातमी आली समोर... सकाळी झालेल्या "त्या' बस अपघातात सर्व प्रवाशांचा झाला मृत्यू...

वेध माझा ऑनलाइन - आज सकाळी इंदूरमधील बातमीने अनेकांना धक्का बसला. मध्य प्रदेशातील इंदूरमधून निघालेली एसटी महामंडळाची बस प्रवाशांसह पुलावरुन खाली कोसळली. त्यावेळी पावसाचंही उधाण होतं. आणि पुलावरुन जाताना अख्ख्या बसने नर्मदेत जलसमाधी घेतली. जेव्हा या बसचा सांगाडा बाहेर काढण्यात आला तेव्हा ते दृश्य पाहून धक्काच बसला.

दरम्यान या घटनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इंदूर-अमळनेरला जाणाऱ्या बस अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या बसमधून एकही जखमी प्रवासी सापडलेला नाही. बसमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

खलघाट एसटी महामंडळ अपघातात बसमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी 3 अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असून या बसमधील व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीमचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. इतर राज्यातील प्रवासी असले तरी त्या प्रत्येकाच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकार 10 लाखांची मदत देणार असल्याचं जाहीर केलं आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी याबाबत माहिती दिली.
सुरुवातील या बसमध्ये 40 प्रवासी असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अपघात घडला तेव्हा बसमध्ये 10 प्रवासी होते अशी अधिकृत माहिती समोर आली आहे.. याशिवाय चालक आणि वाहक होते. असून मिळून या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. वेगवान कारला ओव्हरटेक करत असताना कदाचित नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली अशी माहिती मिळाली आहे

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एसटी महामंडळाची बस बुडून मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करा ; निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश...

वेध माझा ऑनलाइन - मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत

मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला मोठा अपघात  झाला आहे इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातग्रस्त एस टी बस महाराष्ट डेपोची आहे त्यामुळे सरकारची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत तात्काळ ही मदत जाहीर केली आहे

Sunday, July 17, 2022

इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत बुडाली ; 13 जणांचा मृत्यू ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन - मध्य प्रदेशच्या धारमध्ये बसला मोठा अपघात  झाला. इंदूरहून पुण्याकडे येणारी बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. प्रवाशांना घेऊन निघालेली बस खालघाट पुलाचे कठडे तोडून १०० फूट उंचावरून नर्मदा नदीत कोसळली. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला या अपघातात १3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे

प्राथमिक माहितीनुसार, नदीतील पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत ९ जणांचे मृतदेह वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. नदीतील खोल पाण्यात बस बुडाली आहे. त्यामुळे या बसमध्ये नेमके किती प्रवासी होते असे समजते
ही बस इंदूरहून पुण्याकडे येत होती. त्यावेळी पुलाचे कठडे तोडून १०० फुटांवरून ती नर्मदा नदीत कोसळली. नदीतून बस काढण्यासाठी सर्व यंत्रणा आणण्यात आली आहे, अशी माहितीही मिळत आहे दरम्यान, एसडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य आणि मदतकार्य सुरू केले आहे. इंदूर आणि धारहून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

आयसीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर ; पुण्याच्या मुलीने पटकावला देशात पहिला क्रमांक...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - राज्य बोर्ड असो की दिल्ली बोर्ड प्रत्येक निकालावर मुलींची छाप दिसत आहे. नुकताच आयसीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पुण्यातील एका मुलीने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. हरगुण कौर माथरू असं या मुलीचं नाव असून तिला दहावीत 99.80 टक्के प्राप्त झाले आहेत. आयसीएसई दहावीचा एकूण निकाल 99.97 टक्के इतका लागला आहे. तर, आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्राचा निकाल 100 टक्के लागला आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 99.98 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.97 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. पुण्याची हरगुण कौर माथरू ही देशात पहिली आली आहे. ती पुण्यातील सेंट मेरिज शाळेची विद्यार्थिनी आहे. तर मुंबईच्या जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलची अमोलिका मुखर्जी ही 99.60 टक्के गुण मिळवून देशात दुसरी आली आहे. या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 39 इतकी आहे. पुण्यातील हरगुण कौर माथरू, कानपूरमधील अनिका गुप्ता, लखनऊ येथून कनिष्क मित्तल, बलरामपूरचा पुष्कर त्रिपाठी या चारही विद्यार्थ्यांना 99.80 टक्के गुण प्राप्त झाले असून चारही विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा झटका... महाविकास आघाडीच्या काळात बारामती नगरपरिषदेसाठी 941 कोटी मंजूर निधीला दिली स्थगिती...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्तेत येताच महाविकास आघाडीला एकामागेएक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच गेल्या सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमधील सर्व निर्णय रद्द केले. त्यानंतर त्यातील काही निर्णय पुन्हा एकदा घेतले. यामागे त्यांनी कायदेशीर बाबींचं कारण दिलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात अर्थ विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीला स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनीच संबंधित निधी मंजूर केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना झटका देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना नगर विकास विभागातून मंजूर केलेल्या 941 कोटींच्या निधीला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातोय. एकनाथ शिंदे यांनी स्थगित केलेल्या 941 कोटींच्या निधीपैकी सर्वाधिक निधी हा अजित पवार यांच्या बारामती नगरपरिषदेसाठी देण्यात आलेला होता.

आजचे सातारा जिल्ह्याचे कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 44 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 45 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 6  खंडाळा 1 खटाव 4 कोरेगांव 9 माण 2 महाबळेश्वर 0 पाटण 3 फलटण 6 सातारा 10 वाई 1 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 44 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 45 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेना झटका! ; शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घेतला निर्णय...!!

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट व शिंदे गटात चुरस निर्माण झालीय. अनेक आमदारांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलंय. दुसरीकडे पक्ष संघटनेच्या पातळीवर बहुसंख्य पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसत आहे. मात्र, आता कोल्हापूरमध्ये पक्ष संघटनेबाबत उद्धव ठाकरे यांना झटका बसला आहे. शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद म्हणतात...ठाकरे- शिंदे दोन दिवसात चर्चा करणार...यावर संजय राऊत म्हणतात...सय्यद याना हे बोलण्याचे अधिकार कोणी दिले? काळजी पूर्वक वक्तव्य करणे गरजेचे...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळताच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोर शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरेंनी अनेकदा परत बोलावण्याचे प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करणार नसल्याच्या निर्णयावर बंडखोर ठाम होते. शिवसेनेची भाजपसोबतच नैसर्गिक युती असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. अशात उद्धव ठाकरे खरंच पुन्हा भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. यादरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या एक ट्विटनंतर राज्यात मोठ्या नवीन राजकीय घडामोडी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेत्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल.'
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत संजय राऊत यांनी एका वहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही.  अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. तर एकत्र यावं असं का वाटणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.