वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले. त्यानंतर भाजपने संजय राऊत यांना आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आव्हानही त्यांनी स्वीकारलं आहे.
सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या द्या पण...
संजय राऊत म्हणाले, एक देशाचा नागरिक म्हणून, संसदेचा सदस्य म्हणून, बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मला एक बाजू, सत्य म्हणून मांडण्याचा अधिकार आहे. मला जे काही बोलायचं आहे ते मी बोललो. यापुढे जे काही बोलायचं आहे ते मुंबई शहरात जाऊन बोलेन. कितीही प्रयत्न केला.. खोटं करा, खोटं बोला, खोटे पुरावे उभे करा, सरकार पाडण्याच्या धमक्या द्या... पण शिवसेना आणि महाराष्ट्र हा अशा येऱ्यागबाळ्यांपुढे झुकणारा नाहीय
छत्रपती शिवाजी महाराजांपासून हा महाराष्ट्राचा बाणा आहे आणि तो राहील. कुणाला गुडघे टेकायचे असतील, कुणाला महाराष्ट्राची लाज काढायची असेल त्यांनी काढावी... काल केलं ना... महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर म्हटलं. ज्या महाराष्ट्राने कोरोना काळात सर्वोत्तम काम केलं. महाराष्ट्राच्या नद्यांमध्ये प्रेत नाही पडली आणि महाराष्ट्र सुपर स्प्रेडर? किती खोटं बोलतात. भाजपच्या एकाही नेत्याने निषेध व्यक्त केला नाही. हेच का तुमचे महाराष्ट्र प्रेम? दिल्लीच्या दबावापुढे महाराष्ट्र कधीही झुकला नाही असंही संजय राऊत म्हणाले.
फडणवीसांचं आव्हान संजय राऊतांनी स्वीकारलं
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं कि, संजय राऊत यांनी कोर्टात जाऊन बोलावं. त्यावर संजय राऊत म्हणाले, मी कोर्टात बोलणारच आहे. तुम्ही पाहा... मी काल संसदेत मुद्दाम बोललो नाही. कारण, संसदेत जे काही गैरवापर चालला आहे.
ह्रदयनाथ मंगेशकर यांच्याबाबतही सांगितलं कि वीर सावरकरांचं गाण गायल्याबद्दल त्यांना नोकरी गमवावी लागली. मंगेशकरांचं गाण मी आकाशवाणीवरच ऐकलं आहे. मी सकाळीच ऑल इंडिया रेडिओत 36 वर्षे काम केलेल्या महेश केळुसकर यांचं निवेदन या विषयावर ऐकलं, त्यांनाही आश्चर्य वाटलं. एखाद्या गाण्यामुळे, गायल्यामुळे एखाद्या संगीतकाराला नोकरीवरुन काढलं असेल तर ते गाण पुन्हा वाजवणार नाहीत ना? मी आजही ते गाणं आकाशवाणीवर ऐकतो असंही संजय राऊत म्हणाले.
"सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही" : देवेंद्र फडणवीस
संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप करत थेट इशाराही दिला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाहीत. मी इतकं नक्कीच सांगू शकतो कि, मोदीजींच्या सरकारमध्ये कुणालाही व्हिक्टिमाईज कधीही केलं जात नाही. संजय राऊत हे एक व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. संजय राऊत हे एक संपादक आहेत आणि संपादकाला माहिती असतं कि, हेडलाईन कशी घ्यावी आणि दिवसभर आपलं नाव कसं चालेल... त्या प्रकारे ते वक्तव्य करत असतात.
No comments:
Post a Comment