Monday, October 14, 2024

ठाकरे गटाचा 140 जागांवर दावा तर, काँग्रेसने 130 जागांवर दावा केला?

वेध माझा ऑनलाइन।
लवकरच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतल्या जागावाटपासंदर्भात माहिती देण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाने 140 जागांवर दावा केला असून काँग्रेसने 130 जागांवर दावा केल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस पक्षश्रेष्ठीसोबत महाराष्ट्रातल्या जागावाटपासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ठाकरे पक्षाने 140 जागांवर दावा केला तर काँग्रेसलाही 130 जागा हव्या आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे पक्षात जागावाटपावरून तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. तर शरद पवारांच्या राष्ट्रावादीने विधानसभेसाठी 80 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती आहे.  दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये एकूण 150  जागांचा तिढा सुटल्याची माहिती आहे. 

No comments:

Post a Comment