भाजपा नेत्या नवनीत राणा यांना धमकीचं एक पत्र प्राप्त झालं आहे. हैदराबाद येथून हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याच्या धमकीच पत्र स्पीड पोस्टद्वारे प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली. धमकीचं हे पत्र अमीर नावाच्या व्यक्तीनं हैदराबाद येथून पाठवलं आहे.
काय दिली धमकी : "तुम्ही हिंदूंबाबत अधिक बोलता हे योग्य नाही. मला दहा कोटी रुपये द्या, अन्यथा मी तुमच्या घरासमोर.... तुमच्यासोबत काही अनर्थ देखील मी करणार. तुमच्यावर सामूहिक अत्याचार केला जाईल," अशी धमकी या पत्राद्वारे नवनीत राणा यांना देण्यात आली. माझे नातेवाईक दुबई आणि पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख देखील या पत्रात आहे. तुम्हाला जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देखील या पत्राद्वारे देण्यात आली. ही माहिती नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या पत्रासंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे, असं विनोद गुहे यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment