Saturday, October 5, 2024

क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले आमदार शरद पवार यांच्या भेटीला ; क़ाय आहे बातमी...?


वेध माझा ऑनलाइन

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर चांगलेच चर्चेत आले होते. काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे आमदार खोसकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत, या मतदारसंघामध्ये इच्छुकांची देखील गर्दी जमली आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला आले असल्याची माहिती आहे.तर त्यांच्यावरील क्रॉस व्होटिंगचा आरोप चुकीचा असल्याचा शरद पवारांना सांगणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. माझ्यावरील आरोप सर्व चुकीचे आहेत, काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. 

No comments:

Post a Comment