देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकांमध्येही चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकींवेळी ननंद विरुद्ध भावजय असा सामना बारामती मतदारसंघात अत्यंत लक्षवेधी झाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीला काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रणांगणात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता प्रचारालाही वेग आला आहे. युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी मुलासाठी प्रचाराचा नारळ फोडला. लेकासाठी बाप मैदानात उतरला असून भावाविरुद्ध दंड थोडपले आहेत. त्यामुळे, बारामतीत निवडणुकीमुळे भावाची भावकी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment