Monday, October 14, 2024

उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली - मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली असून त्यांना विविध तपासण्या करण्यासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. ते आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे शिवसैनिक चिंतेत आहत. धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्यांची अँजिओग्राफी देखील केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याआधी त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली आहे. त्यामुळे डॉक्टर हार्ट ब्लॉकेजशी संबधित व हृदयाशी संबंधित इतर तपासण्या करत आहेत. अँजियोग्राफीमद्वारे हार्ट ब्लॉकेज तपासता येतात. अँजिओग्राफीत हार्ट ब्लॉकेज आढळले तर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी व इतर उपचार केले जाऊ शकतात.

No comments:

Post a Comment