अजित पवारांनी नेतृत्वावरुन शरद पवारांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. वडिलांची सत्तरी पार झाली तरी हट्टीपणा जात नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहुयात.
‘वडील सत्तरी पार झालेत तरी हट्टीपणा सोडत नाहीत. जबाबदारी सोपवणार की नाही.’ म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांच्या मनातलं समोर आलंय. पुण्याच्या मावळमध्ये विकास कामांचा लोकार्पण सोहळा अजित पवारांच्या हस्ते झाला. मात्र नाव न घेता अजित पवारांचा टोला शरद पवारांनाच होता. जबाबदारी देऊन तुम्ही मार्गदर्शन करा, असं याआधीही अजित पवार अनेकदा बोलले आहेत. आता पुन्हा सासू सूनेचं उदाहरण देवून अजित पवारांनी शरद पवारांना डिवचलं आहे. तर पुण्यात शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. पुढचे 3 दिवस शरद पवार पुण्यातच तळ ठोकून असतील.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी नेते मतदारसंघावर आतापासूनच दावा ठोकत आहेत. अनेक मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्याचं काम महायुती आणि महाविकासआघाडी दोघांकडून सुरु आहे. निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे मागे राहू नये म्हणून प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. एकीकडे महायुतीचा केलेल्या कामांचा जोरदार प्रचार सुरु आहे तर महाविकासआघाडीचे नेते ही प्रचाराला लागले आहेत. बैठकांवर बैठका सुरु आहेत.
शरद पवारांनी इच्छूकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. त्यातच अनेक नेते तिकीट मिळणार की नाही याचे संकेत मिळतात पुढची वाट धरत आहेत. असं असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाना साधलाय.
No comments:
Post a Comment