विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबद्दल तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्याविषयी अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांना माहिती दिल्याचे सांगितले. यावेळी रामराजे यांनी शरद पवार यांना मी दोनवेळा भेटलो, अशा बातम्या सुरू आहे. पण ज्या माणसाने मी आमदार नसताना मला मंत्री केले आणि त्या माणसाला पक्षफुटीवेळी सोडून मी अजित पवार यांच्याकडे गेलो. कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू तुम्हीच सांगा? असे विधान रामराजे यांनी केले.
त्यांच्या या केलेल्या विधानामुळे ते शरद पवार गटात जाण्यास इच्छुक असल्याचे एकप्रकारे दिसत आहे. तसेच अजित पवार गटात धुसफूस सुरू असल्याचे देखील उघड झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक गोष्टीबाबत मत व्यक्त केले. यावेळी रामराजे म्हणाले की, आज दिवसभर मी अजित पवारांना सोडून जाणार, अशा बातम्या माध्यमं देत होती. आपल्या विरोधकांनी या कंड्या पिकवल्या का? हे पाहावे लागेल. कारण त्यांना असले उद्योग करण्याची घाण सवय आहे. कारण आपण पवारसाहेबांकडे गेलो तर भाजपच्या चिन्हावर त्यांना फलटणची जागा लढायला मिळेल, असा त्यांचा उद्देश असेल असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment