डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन करण्याची ही संधी असून या ठिकाणी डॉ भोसले यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले व कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसलेयांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी वारकरी, माजी सैनिक, शेतकरी आणि माता-भगिनींच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, आप्पा माने अतुल शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने सत्ताकाळात लाडकी बहीण योजना का राबवली नाही? एखादा प्रोजेक्ट लांबणीवर पडल्याचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले गेले. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांना दोषी मानता येणार नाही. राष्ट्रवादीने सत्ताकाळात प्रकल्प रखडवले, नवीन योजना आणल्या नाहीत, विकास खोळंबला. त्यामुळेच आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर फुटाफुटीचे प्रकार घडत आहेत. परंतु, लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. अशांना खरंतर नोबेल पारितोषिक द्यायला हवे, असे टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महायुती सरकारकडे आपण मागितलेल्या विकासकामांसाठी आतापर्यंत एकूण 745 कोटी 87 लाख रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. त्यातील बहुतांश कमी आज पूर्णत्वास आली असून काही प्रगतीपथावर आहेत. कराडमधील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटींच्या निधीची तरतूद आहे. परंतु, विरोधकांनी केवळ दहा लाखांची तरतूद असल्याचे जाहीर व्यासपीठावर सांगितले. स्वतःला मोठा नेता समजणाऱ्यांनी शासन निर्णय न पाहता असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावत आतापर्यंत माहिती सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोषणा व व निधीच्या तरतुदीबाबत सर्वांसमोर पुराव्यांनिशी आकडेवारी सांगितली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्याचा समाचारही त्यांनी यावेळी घेतला.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडच्या एमआयडीसीची सुधारणा करून प्रशस्त रस्ते, सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. नवीन उद्योग व गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल. यशवंतराव चव्हाण कराडची ओळख असून त्यांच्या आदर्शनुसार विकासनिधी आणण्यावर प्रयत्न करणार आहे. कराड दक्षिणचा काय पलट करणार असून कराडला रिंग रोड करण्याचा प्रयत्न राहील. नॅशनल हायवेपासून खोडशी ते कराड असा नवीन पुल उभारण्याचा अजेंडा आहे. त्याचबरोबर कृषीवर आधारित उद्योगधंदे निर्माण करणे, कृष्णा कारखान्यामार्फत इंडियन ऑईलच्या माध्यमातून बायो सीएनजी प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करणे, ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि अध्यात्मिक पर्यटन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
तसेच कराड दक्षिणमधील भाजपमध्ये एकमत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, नव्हते आणि राहणार नाहीत, असे डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
सोशल मिडियावर फिरणार ती पोस्ट खोटी ; विक्रम पावसकर
डॉ. अतुल भोसले यांनी विक्रम
पावसकर यांचा विधान परिषदेचा पत्ता कट केला. अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. यावर बोलताना विक्रम पावसकर यांनी ती पोस्ट खोटी असल्याचे सांगत डॉ. अतुल भोसले हे विधानसभेत जाणार असून तेच माझ्यासाठी शब्द टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment