वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलं तापलेलं दिसतंय. राज्यात कोणत्याही वेळेला विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू होऊ शकते अशी स्थिती आहे. अशातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी आणि किती टप्प्यात होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राने झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत या दोन्ही विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक केव्हाही जाहीर केले जाऊ शकतात. निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली असून लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा निवडणुका या आठवड्यात जाहीर होऊ शकतात.
राज्यात किती टप्प्यात मतदान?
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
दरम्यान राज्यातील बडे नेते शरद पवार यांनी देखील महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसात निवडणुका जाहीर होतील असे म्हटले आहे. शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये राज्य सरकारने घेतलेल्या 80 निर्णयावर टीका करताना शरद पवार यांनी सांगितले की,” महाराष्ट्राचा लौकिक वेगळा होता. उत्तम प्रशासन म्हणून लोक महाराष्ट्राकडे पाहत होते. आज लोकांनी यांची टिंगल करावी अशी स्थिती राज्यकर्त्यांनी केली आहे. सरकारनं किती निर्णय घेतले आणि त्यामधील किती निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. याबरोबरच शनिवारी अजित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीचे संकेत देत देत इयत्ता दोन-तीन दिवसात आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर निवडणुका होतील असे म्हंटले होते.
No comments:
Post a Comment