Sunday, October 13, 2024

राजेंद्रसिंह यादव यांनी आणलेल्या 209 कोटींच्या विकासकामांचे उद्या भूमिपूजन

वेध माझा ऑनलाइन।
यशवंत विकास आघाडीचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अथक पाठपुराव्याने कराड शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे 209 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी 14 रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. 

या कामांचे भूमिपूजन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार असून राजेंद्रसिंह यादव यांच्यासह यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 हा कार्यक्रम नवीन जलशुद्धीकरण केंद्र येथे होणार आहे. त्यानंतर यशवंत हायस्कूल पाठीमागील लल्लुभाई मैदान येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा सकाळी 11 वाजता होणार असून त्यानंतर भव्य महिला महोत्सवास प्रारंभ होणार आहे.
कराड शहरातील भुयारी गटार योजनेचे अद्ययावतीकरण व सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठपुराव्याने मंजूर केलेला आहे. याशिवाय अन्य विकासकामे अशा एकूण 209 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे.या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजेंद्रसिंह यादव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment