वेध माझा ऑनलाइन।
सातारा जावळी विधानसभा मतदार संघात महायुतीने यापूर्वीच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी तर्फे अर्ज भरण्यास काही दिवस उरले असताना देखील उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. दरम्यान, आज रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित कदम यांना सातारा जावळीची उमेवारी देण्यात आली. तत्पूर्वी कदम यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन सन्मानपूर्वक शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने उमेदवारी लढवण्यासंदर्भात एबी फॉर्मदेखील देण्यात आला. त्यामुळे आता सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध अमित कदम असा दुरंगी सामना रंगणार आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, महाविकास आघाडीने मात्र उमेदवार ठरवण्यात विलंब केला. त्याबाबत शनिवार, रविवार मुंबई येथे महाविकास आघाडीमध्ये अनेक राजकीय खलबते झाली. प्रामुख्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाईल असे राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सोडला गेल्याने दोन दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी मुंबईमध्ये घडल्या.
No comments:
Post a Comment