महायुतीमधील आणखी एक नेता शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री फलटण येथील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्याच कलाने निर्णय घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे नाईक निंबाळकर यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवार यांची साथ सोडतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी धक्का ठरेल.
No comments:
Post a Comment