Sunday, October 13, 2024

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी खळबळजनक माहिती

वेध माझा ऑनलाइन ।
राज्याचे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी बाब सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हत्या प्रकरणातील पहिला आरोपी हा करनैल सिंह असून तो मुळचा हरियाणाचा आहे. तर दुसऱ्या आरोपीचेे नाव धर्मराज कश्यप असे असून तो मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील आहे.

सिद्दीकी हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती
मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कट शिजत होता. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले होते. तसेच तीनही आरोपी बाबा सिद्धिकी बाहेर येण्याची वाट पाहात होते.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी या खोलीसाठी महिन्याला 14 हजार भाडं देत होते अर्शी माहिती मिळत आहे


No comments:

Post a Comment