Monday, October 14, 2024

रामराजे डरपोक नेते ; कोणी केली टिका? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
सत्तेची कवचकुंडले नसतील तर रामराजे दबावाचे आणि दहशतीचे राजकारण करू शकत नाहीत, हे समजल्यानेच ते विचलीत झाले आहेत. ते जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते आहेत. त्यांच्याकडून लोकसभेलाही नव्हती आणि आत्ताही महायुती धर्म पाळण्याची अपेक्षा ठेवली नाही. कार्यकर्ते दुसरीकडे आणि हे तिसरीकडे राहणार असल्याचा पोरखेळ त्यांनी सुरू केलाय. आमच्या नावाखाली त्यांनी त्यांची पापे लपवू नयेत अशी जळजळीत टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार रामराजे निंबाळकर यांच्यावर केली.
भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी येथे नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामराजे यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी आ. गोरे म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन रामराजे महायुती सोडून जा, असे सांगत आहेत. ते स्वतः का थांबले आहेत, ते कुणालाच समजत नाही, अशी त्यांची बाळबोध कल्पना आहे. महायुतीचा प्रयोग करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिलाय. लोकसभेला महायुती तोडली तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती. त्यांना महायुतीत मदत कुणी मागितली आहे. यापूर्वी त्यांनी कधी महायुतीला मदत केली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांची आणि आमची लढाई आजची नाही.

No comments:

Post a Comment