Sunday, October 6, 2024

कोंग्रेस खासदाराच्या मुलाला ठोकल्या बेडया ; क़ाय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा मुलगा गणेश हांडोरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कारण गणेश हांडोरे विरोधात गोवंडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोवंडी पोलिसांनी खासदाराच्या मुलाला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं? :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा मुलगा गणेश हांडोरे हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीत येथे गेला होता. त्यावेळी गोवंडीहून पुन्हा परतत असतानाच त्यांनी चेंबूरमधील आचार्य कॉलेजजवळ एका दुचाकी वाहनाला धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार गोपाळ आरोटे या इसमाला दुखापत झाली. यानंतर दुखापतग्रस्त गोपाळ आरोटेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल न करताच गणेश हांडोरेने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर गोपाळ आरोटे या रुग्णाची शुगर वाढली. त्यानंतर त्यांना मुंबईतील जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

खासदाराच्या मुलाला पोलिसांनी केली अटक :
हा संपूर्ण प्रकार शुक्रवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान घडला आहे. या घटनेनंतर गोवंडी पोलीस ठाण्यात गणेश हांडोरे विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र या तक्रारीनंतर गोवंडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे
मात्र आता खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या मुलाला म्हणजेच गणेश हांडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर गोपाळ आरोटे या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास गोवंडी पोलीस करत आहेत.



No comments:

Post a Comment