वेध माझा ऑनलाइन।
परिवर्तन महाशक्तीमधून तिसरी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सोबत न जाता परिवर्तन महाशक्तीमध्ये माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू आदी नेत्यांनी एकत्रित महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांची विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली असतानाच आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र संभाजीराजे यांनी कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
संभाजीराजे यांनी नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे अंतिम निर्णय मंगळवारी घेणार असल्याचं त्यांनी सांगत अजून एक द्विधा मनस्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment