कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने, सोमवार दिनांक २८-१०-२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, कराड येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तसेच अर्ज दाखल करून दुपारी २.३० वाजता कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या शेजारील पटांगणात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तसेच कराड, कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यातील मतदार संघातील विविध गावचे ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांनी दिली.
यावेळी आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांचे निवासस्थान, मंगळवार पेठ कराड येथून मुख्य रस्त्याने सकाळी ११.३० वाजता रॅलीस सुरुवात होणार असून, या रॅलीमध्ये सहभागी होऊन आमदार बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि तद्नंतर होणार्या भव्य सभेसाठी सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ११.३० वाजता आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांचे निवासस्थान, मंगळवार पेठ, कराड येथे हजर रहावे असे आवाहन कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment