Tuesday, October 8, 2024

सातार्यात मुसळधार पावसाचा इशारा #

वेध माझा ऑनलाइन।
अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस शांत स्वरूपात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने मात्र रौद्ररूप धारण केलेले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे राज्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे. पावसाचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असणार आहे. त्याचप्रमाणे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment