वेध माझा ऑनलाइन।
गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचं गुऱ्हाळ चालू आहे. या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचा नेमका फॉर्म्यूला अद्याप समोर आलेला नाही. ज्या-ज्या जागांवर तोडगा निघालेला आहे, त्या-त्या जागांवर वेगवेगळे पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाने नुकतेच आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाईनंतर फलटण विधानसभा मतदार संघ हा अजितदादा गटाकडे आला असून या मतदार संघातून सचिन पाटील यांना उमेद्वारी देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे दीपक चव्हाण विरुद्ध अजित पवार गटाचे सचिन पाटील कांबळे अशी लढत होणार आहे
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली आहे. गेली दोन वर्षे त्यांचे फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू केले. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. मात्र, ऐनवेळी आता जागा वाटपात फलटण विधानसभा मतदार संघ हा अजितदादा पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे या मतदार संघातून अजित पवार गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवार यादीत सचिन पाटील कांबळे यांचे नाव आहे.
No comments:
Post a Comment