राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज 5 ऑक्टोबररोजी देशातील दोन बडे नेते राज्य दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुका तोंडावर असताना हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत तर राहुल गांधी आज कोल्हापुरात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याला अधिक महत्वाचं मानलं जातंय. मोदी आज वाशिमसह ठाणे, नवी मुंबईतही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते अनेक उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे.
No comments:
Post a Comment