वेध माझा ऑनलाइन।
पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय गेम होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांना विधानसभेचं तिकीट जाहीर केलं ते आमदार दीपक चव्हाण यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार आज फलटणमध्ये आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी त्यांची रामराजे निंबाळकर यांच्यासोबतही बैठक झाल्याची चर्चा आहे. पण रामराजे निंबाळरकर यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीदेखील शरद पवार गटात आज प्रवेश केला आहे.
फलटणमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. फलटणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पण रामराजे निंबाळकर हे शरद पवार गटात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर आली. पण असं असलं तरीही फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी याआधीच फलटणसाठी उमेदवारी जाहीर केल्याची माहिती आहे. असं असताना दीपक चव्हाण यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक चव्हाण यांच्यासह सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीदेखील अजित पवार गटाची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले?
“रामराजे, रघुनाथराजे आणि माझे राजकारण हे अपक्ष सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय झालाय. मी शरीराने एका बाजूला होतो आणि मनाने एका बाजूला होतो हे तुम्हाला माहिती आहे. मुळात आम्ही हा निर्णय घेण्याऐवजी कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आपण शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतोय आणि त्याला तुमच्या सगळ्यांचा होकार आहे असे मी गृहीत धरतो. यांच्यामुळे कुणाला चिन्ह माहिती नव्हते. मात्र हे कशामुळे कळले तर मागे बसलेले शरद पवार, विजयसिंह मोहिते दादा बसलेले आहेत त्यामुळे समजले”, असं संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
No comments:
Post a Comment