कराड
कराड शहराच्या नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे यांच्या हस्ते आज गुरुवार दिनांक 14 मे रोजी कराड नगरपालिकेच्या प्रांगणात कोरोना योद्ध्यांना प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदिक काढ़ाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी जनकल्याण समितीचे श्री संदीप कुलकर्णी, रा. स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांतजी एकांडे, सुखायु फाऊंडेशन चे अध्यक्ष वैद्य नचिकेत वाचासुंदर यांसह वैद्य संजय सबनीस, श्री देवदत्त फलटणकर तसेच नगरपालिका प्रशासनाचे विविध अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
या उपक्रमा अंतर्गत कराड व मलकापूर नगरपालिकेचे स्वच्छता दूत, सुरक्षा कर्मी, आरोग्य विभागाचे कर्मचारी , घरगुती गैस सिलेंडर वितरण व्यवस्थेमधील कर्मचारी या सर्व करोना योद्ध्यांना या काढ्याचे दररोज वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचे शहर व परिसरातून कौतुक होत आहे.इतरांनीही यातून आदर्श घ्यावा व असे उपक्रम राबवावेत अशा प्रतिक्रिया शहरातील लोकांनि व्यक्त केल्या आहेत.
No comments:
Post a Comment