Wednesday, May 6, 2020

कऱ्हाड ः कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड शहरात शासनाकडून किराणा माल नागरिकापर्यंत पोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ती यंत्रणा कार्यान्वित होण्यास विलंब होत आहे. अशा स्थितीत कऱ्हाडच्या गणेश प्रल्हाद पवार या युवकाने किराणासह भाजीपाला घरपोच करण्याचे ऍप डेव्हलप केले आहे. त्याला प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनीही मान्यता दिली आहे. त्या ऍपव्दारे सामान्यांनी त्यांना हवे असणाऱ्या साहित्याची मागणी मोबाईलव्दारे त्या ऍपवर नोंदवल्यास त्यांना त्या वस्तू घरपोच मिळणार आहेत. त्याच्या ऍपव्दारे किराणा, भाजीपाला घरपोचला नागरिकांनी पसंती दिली आहे.
थांबा! व्हॉट्‌सऍपवर पाेस्ट करण्यापुर्वी हे वाचा
 
पवारला चेन्नईतील सर्व्हे हर्ट कंपनीने तयार केलेले ऍप नेटवर आढळले. त्याने ते डाउनलोड करून घेतले. त्यानुसार त्या ऍपने दिलेल्या पाथ वेवरून त्याने कऱ्हाड शहरात किराणा माल, भाजीपाल्यासारख्या सुविधा नागरिकांना घरपोच कशा देता येतील, याचा विचार केला. त्यानुसार त्या ऍपला सात ते आठ वेळा अपग्रेडेशन केले. त्यात सुधारणा केल्या. त्यानंतर ते ऍप प्रॉपर रन होण्यास तयार झाले. त्याची पहिली चाचणी त्यांनी प्रभाग क्रमांक सातमध्ये घेतली. ती चाचणी यशस्वी झाली. त्यावेळी त्यांनी त्याबाबत प्रांताधिकारी दिघे व अन्य शासकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली.
त्यांनीही त्या ऍपमधील बारीक गोष्टी समजावून घेतल्या. काल रात्री उशिरा त्या ऍपला शासकीय पातळीवर मंजुरी देऊन ते ऍपच्या प्रत्यक्ष कामास परवानगी दिली आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्या ऍपवर आता शहरातील प्रत्येक प्रभागातील दुकानदारांची यादी प्रभानिहाय अपलोड केली आहे. त्यात 66 दुकानदार आहेत. त्याशिवाय भाजीपाला पोच करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे जोडली आहे. त्याव्दारे सेवा सुरू आहे. साहित्य पोच करण्याचे कोणतेही चार्जेस लावले जात नाहीत. 

No comments:

Post a Comment