अजिंक्य गोवेकर
कराड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पुरेसं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च करणं अपेक्षित असून अमेरिकेतील लेंडिंग आणि स्पेंडिंग धोरणानुसार विचार करणे अपेक्षित असल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे. पण या पॅकेजमध्ये आरबीआयने केलेली मदत गृहित धरली जाऊ नये असंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजवर समाधान व्यक्त करत चव्हाण म्हणाले,“अमेरिकेने जीडीपीच्या ११ टक्के, जपानने १० टक्के, जर्मनीने २२ टक्के इतकं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामुळे २०४ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताने १० टक्के खर्च करणं अपेक्षित होतं. आता लोकांना विश्वास देणे आवश्यक आहे. उत्पादन वाढून पुरवठा जरी झाला तरी मागणी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावं लागेल. अर्थव्यवस्थेचं चक्र फिरतं ठेवायचं असेल तर कामगार, शेतकऱ्यांच्या खिशात पैसे पोहोचणं गरजेचं आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं
“कामगारांचे पैसे देण्यासाठी उद्योग, कंपन्यांकडे पैसे नाहीत. लॉकडाउनच्या काळात कामगारांना टिकवायचं असेल तर त्यांना थेट पैसे देण्याची गरज आहे. लघु उद्योगांना चालना आवश्यक आहे. लोकांच्या खिशापर्यंत कसा पोहोचवायचा याचा विचार केला पाहिजे. देशातील ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मनरेगा हा एक चांगला मार्ग आहे. शहरी भागात मनरेगासारखा मोठा कार्यक्रम राबवता येऊ शकला पाहिजे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल आहे.

No comments:
Post a Comment