Thursday, May 7, 2020

आ.पृथ्वीराजबाबांची प्रशासनाच्या साक्षीने कराडातील व्यापारांशी चर्चा ;

अजिंक्य गोवेकर
कराड
 कराड परिसरामध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता खबरदारी करिता पूर्ण लॉकडाऊन सुरु आहे.  अत्यावश्यक सेवा घरपोच जरी सुरु असल्या तरी त्या तितक्या प्रभावीपणे राबविली जात नाही अश्या तक्रारी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अनेक नागरिकांनी दिल्या.  यामुळे आ पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला सोबत घेत कराड मधील व्यापाऱ्यांशी चर्चा केली.  या बैठकीला कराड उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,  तहसीलदार अमरदीप वाकडे,  व्यापारी असोसिएशन चे राजू शहा, दिनेश पोरवाल, स्वप्नील शाह तसेच केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील व दक्ष कराडकर चे प्रमोद पाटील उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान व्यापाऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या कि, प्रशासनाने सांगितले आहे कि नागरिकांना किराणा व औषधे घरपोच मिळतील व त्याप्रमाणे सेवा देण्यास आम्ही तयार आहोत परंतु घरपोच सेवा देताना मनुष्यबळ आवश्यक आहे व त्यांना प्रशासनाकडून पासेस सुद्धा देणे गरजेचे आहे तरच आमच्याकडून घरपोच सेवा देता येईल. तसेच धान्याचे व औषधांचे ट्रक गोडाऊन मध्ये उतरविण्यास परवानगी दिली जावी. असे काही महत्वाचे प्रश्न व्यापाऱ्यांकडून आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर मांडण्यात आले.

यानुसार आ. चव्हाण यांनी प्रांत व तहसीलदार यांच्याशी किराणा व औषधे कराडच्या जनतेला घरपोच मिळण्याबाबत चर्चा केली तसेच सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी कराड परिसरातील रेड झोन मधील मायक्रो कन्टेन्टमेन्ट एरिया निर्धारित करून त्याच भागामध्ये कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी केली जावी तसेच इतर परिसरात किमान अत्यावश्यक सेवा सुरू कराव्यात तसेच कराड परिसरातील किराणा व औषधे यांची सुसज्ज यंत्रणा करावी अशी चर्चा फोनवरून झाली. 

-----------------------------------------------------------------------

अधिक महितीसाठी संपर्क साधा

मुकेश मोहिते

जनसंपर्क विभाग

आ. श्री पृथ्वीराज चव्हाण कार्यालय

मोबाईल – 9422022007

1 comment: