Thursday, May 28, 2020

आज दिवसभरात जिल्ह्यात 30 जण बाधीत सापडले ; जिल्यातील रुग्णसंख्या 452 झाली

कराड
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी ४ आणि रात्री उशीराने पुन्हा २६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने नागरिकांत कोरोनाची दहशत पसरली आहे. तसेच आज कराड तालुक्यातील म्हासोली येथील ८ कोरोना रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ४५२ वर पोहोचली आहे. पुण्या मुंबईहून सध्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आलेले असून नवे कोरोनाग्रस्त हे अशांपैकीच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाहेरुन प्रवास करुन आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये राहून नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment