Tuesday, May 12, 2020

पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी घेतली आढावा बैठक


कराड
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी शासकीय विश्रामगृह कराड येथे तालुक्यातील पेयजल पाणी पुरवठा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली.
               या बैठकीस प्रांताधिकारी उत्तम दिघे, डी.वाय.एस.पी. सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, बी.डी.ओ. आबासाहेब पवार, पाणी पुरवठा उपभियंता आडकेसो उपस्थित होते.
               तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील गोसावेवाडी, मस्करवाडी, वडोली. भि., मुत्तलवाडी, नांदगाव आदी.गावांच्या पाणी पुरवठ्याबाबत चालू परिस्थितीचा आढावा घेतला व भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी विषयी चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या.

त्याचबरोबर कोरोना विषाणूचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पाठपुरावा होत आहे का याची माहिती घेतली. ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी ओषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा कशा प्रकारे केला जात आहे याची माहिती पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली.

No comments:

Post a Comment