कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी १३ रूग्णांची भर पडल्याचे आज दुपारी आरोग्य विभागाच्या अहवालातुन स्पष्ट झाले आहे. यामध्ये कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेसह आगाशीवनगर, तांबवे, गमेवाडी, गोटे, उंब्रज वनवासमाची येथील रुग्णांची समावेश आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 86 वर गेल्याने कऱ्हाडकर चांगलेच धास्तावले आहेत. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात आणखी पाच कोरोनाबाधित सापडल्याने जिल्ह्याची संख्या ११३ वर गेली आहे.
आजच सकाळी मलकापुर-आगाशिवनगर येथील दोन बाधित रुग्ण सापडले होते. एकाच दिवशी दुपारपर्यंतच बाधितांची संख्या १५ ने वाढल्याने आबालवृध्दांसह प्रशासनही गडबडून गेले आहे. कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या वाढुन ती 86 कडे गेल्याने कऱ्हाडकरही चांगलेच धास्तावले आहेत.दरम्यान, बुधवारी (ता. ६) पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात ९२ ,कोल्हापूर १६, सांगली ३५, रत्नागिरी १६ अशी कोरोनाबाधितांची संख्या होती. आज तब्बल २१ रूग्ण वाढल्याने सातारा जिल्ह्यात कोरोनाची संख्या ११३ झाली आहे. परिणामी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे.

No comments:
Post a Comment