Friday, May 8, 2020

कृष्णा हॉस्पिटल मधून सहा जण झाले कोरोनामुक्त ; त्यामध्ये 3 वर्षाचे बालक व 87 वर्षाच्या वृद्धाचा समावेश ; आज मिळाला डिस्चार्ज


कराड
येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या ६
 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
 या ६ कोरोनामुक्त, पेशंटमध्ये ८७ वर्षाच्या आजोबां पासून ३ वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.
या सहा रुग्णानवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे सहाही रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. 
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी या कोरोनामुक्त तरुणांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना हॉस्पिटलमधून निरोप दिला.

No comments:

Post a Comment