Saturday, May 30, 2020

यशवंत बँकेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद ; उपक्रमाचे शहर व परिसरातून होतंय कौतुक ; इतरांनीदेखील असे उपक्रम राबवण्याची गरज

कराड
कोरोनाचे संकट सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात घोंघावत आहे.अशातच रुग्णांची दिवसेंदिवस वाढती आकडेवारी चिंतेचा विषय बनली आहे. आणि त्यातच लॉकडाऊनमुळे सध्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी यशवंत बँकेने कराडमधील यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेच्या सहकार्याने आज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण 40 ते 50 जणांनी आज याठिकाणी रक्तदान केले. लॉक डाऊन च्या सुरुवातीच्या काळापासून यशवंत बँकेने आपली सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मदतीचा हात देत या संकट काळात शेकडो संसाराला सावरण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.हजारो अन्नधान्य किट चे वाटप या संस्थेने केले आहे.जीवनावश्यक वस्तूंचे वाटपदेखील बँकेच्या माध्यमातून झाले आहे. मास्क,सॅनिटायझर असे विविध सहकार्य करीत यशवंत बँकेने आपल्या कर्तव्यदक्षतेचे दर्शन जनतेला दिले आहे.संस्थेचे अध्यक्ष व सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या संकल्पनेतून व यशवंत बँकेच्या माध्यमातून याच कर्तव्याचा एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिराचे आयोजनदेखील करण्यात आले होते. 40 ते 50 जणांनी आज या शिबिरातून रक्तदान केले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, संचालक प्रा.श्रीकृष्ण जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली मोकाशी, उद्योजक मुकुंद चरेगांवकर, माजी नगरसेवक घन:श्याम पेंढारकर, नितीन वास्के आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे सेवक, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांसह ४० ते 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरात आपला सहभाग नोंदवला. इतरांनीही यातून आदर्श घ्यावा व असे समाजहिताचे उपक्रम राबवावेत अशी यावेळी लोकांनि अपेक्षा व्यक्त केली.या उपक्रमाबद्दल जनतेतून यशवंत बँकेचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment