Sunday, May 31, 2020

शिवरुद्राक्ष वाद्य पथकाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद ; उपक्रमाचे शहरातून होतंय कौतुक

                   
कराड /शहरातील शिवरुद्राक्ष वाद्य पथक व महालक्ष्मी ब्लड बँक कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्या अधिकच वाढत आहे. त्यामुळे अनेक भागात रुग्णांना रक्ताची गरज भासू लागल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन करून शिवरुद्राक्ष वाद्यपथकाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शिबिरात सुमारे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. सर्व रक्तदात्यांना मास्क व होमिओपॅथिक " अर्सेनिक अल्बम -30 गोळ्यांचे यावेळी वाटपही करण्यात आले.मंगळवार पेठ येथील नगरपालिका शाळा नं 9 गणपती पारडे येथे सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व वादकांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment