Tuesday, May 19, 2020

कराडच्या ब्लु डायमंड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंसह मास्कचे वाटप ; उपक्रमाचे शहरातून होतय कौतुक

कराड-  कोरोनाच्या सध्याच्या उदभवलेल्या  संकटांमुळे गोरगरीब जनतेची परवड सुरू आहे.अनेक मदतीचे हात त्यांना मदत करण्याकरिता पुढे येत असतानाच, येथील ब्लु डायमंड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेदेखील या गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू तसेच मास्कचे वाटप नुकतेच करण्यात आले. या उपक्रमाचे शहरातून कौतुक होतय.
ब्ल्यू डायमंड चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. कोरोनाच्या या  महामारीमध्ये सध्या देशात गेली 50 दिवस झाले लॉकडाऊन चालू आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. अशा बिकट परिस्थिती मध्ये मदतीचा हात पुढे करत येथील
 ब्ल्यू डायमंड चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी स्वखर्चाने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची गरज ओळखून तेल, चटणी, मीठ, साबण, साखर, व इतर वस्तूचे मिळून सुमारे शंभर किटचे वाटप केले. प्रशासनाने  मास्कचा वापर सक्तीचा केला असूनदेखील काही नागरिक मास्कचा वापर टाळतात हे ओळखून या भागात सुमारे 500 ते 600 मास्क वाटप करण्यात आले. तसेच कोरोना पासून  वाचण्यासाठी घरात रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा असा संदेश देत लोकांना याबाबत मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
सदर उपक्रमास या ट्रस्ट चे अध्यक्ष अमोल सोनावले तसेच माजी नगरसेवक गंगाधर जाधव, डॉ अनिल वाघमारे, सचिन आढाव, जावेद भाई रंगरेज, मिलिंद कांबळे, विनोद सोनवले, रत्नाकर कांबळे, राहुल सोनवले, प्रीतम थोरवडे, अमोल कराडकर,  विश्वनाथ शिंदे महेंद्र रणबागले, विशाल दुपटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment