Saturday, May 23, 2020

आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात 77 कोरोना बाधित सापडले ; जिल्हा हादरला

कराड
पुण्याहून आलेल्या रिपोर्टनुसार 31 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात परवा पाचगणी येथे मृत्यू पावलेल्या महिलेलाचाही समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी सातारा जिल्ह्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा 6 रुग्ण सापडले. आता रात्री पुन्हा 31 नवीन कोरोना बाधित सापडल्याने आज दिवसभरत जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर जिल्ह्यात सापडलेली हि सर्वाधिक आकडेवारी आहे.

आज सापडलेले रुग्ण कोणत्या तालुक्यातील आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र नव्याने सापडलेले बहुतांश रुग्ण हे पुण्या मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातून बाधित झालेले असल्याचे समजत आहे. तेव्हा बाहेरून प्रवास करून आलेल्या क्वारंटाईन मधील नागरिकांना नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 278 वर पोहोचली आहे. या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 158 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.


No comments:

Post a Comment