अजिंक्य गोवेकर
कराड : कराड परिसरामध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने कराड शहर सहित आसपासची १३ गावे पूर्ण लॉकडाऊन केलेली आहेत. २३ एप्रिल पासून सुरु झालेला ह्या कडक लॉकडाऊन मुळे कराडच्या जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या सर्व समस्येंबद्दल कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने यांनी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत चर्चा केली या चर्चेवेळी त्यांच्या सोबत काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण उपस्थित होते.
कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात व परिसरात प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. खबरदारीकरिता प्रशासनाने निर्णय जरी घेतला असला तरी नागरिकांना किराणा व औषधे मिळत नाहीत म्हणून त्रस्त आहेत. कराड शहरातील जनता लॉकडाऊन चे काटेकोर पालन करीत आहे परंतु जीवनावश्यक वस्तूच मिळत नसल्याने कराडचे नागरिक त्रस्त आहेत यासाठीच माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन शहरातील जनतेच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. यानुसार पृथ्वीराज बाबांनी या सर्व समस्यांची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतो असे सांगितले.
No comments:
Post a Comment