Sunday, May 10, 2020

गरजूंच्या मदतीसाठी सरसावला कृष्णा उद्योग समूह

कराड, ता. १० : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कराड तालुक्यातील कोरानाबाधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात असल्याने, या भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहे. याची दखल घेत कोरोनाबाधित क्षेत्रातील गरजू लोकांच्या मदतीसाठी कृष्णा उद्योग सूमह पुढे सरसावला आहे.

कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा समूहाच्या माध्यमातून कोरोनाबाधित क्षेत्रातील गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात पुढाकार घेतला आहे. कृष्णा समूहाच्यावतीने तांदूळ, आटा, तूरडाळ, तेल, चटणी, मीठ, हळद, डेटॉल साबण आणि मास्क अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार केले असून, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते या जीवनाश्यक वस्तूंचे २०० कीट तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आले. तालुका प्रशासनाच्या माध्यमातून या जीवनावश्यक वस्तू गरजूंपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या पोलिसांसाठी कृष्णा कारखान्याच्यावतीने उत्पादित करण्यात आलेले हॅन्ड सॅनिटायझर कृष्णा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात आले. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक एस. डी. शेलार यांच्याकडे हॅन्ड सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी कृष्णा विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण, सुनील काळे, विक्रम पवार, सुनील यादव, हर्षल जगताप, निवास मोरे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी :

कराड : कृष्णा उद्योग समूहाच्यावतीने जीवनाश्यक वस्तूंचे कीट तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे सुपूर्द करताना एस. ए. माशाळकर, व्ही. वाय. चव्हाण व इतर.
---

No comments:

Post a Comment