कराड
दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधीत महिला रूग्णाला रूग्णवाहिकेतून न नेता त्या महिलेस चालवत नेले. हा संतापजनक प्रकार येथे उघडकीस आल्यानंतर त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.ना.शंभूराज देसाई यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत, दरम्यान रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शिंदेंची या प्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.काही दिवसांपूर्वी याच हॉस्पिटल मध्ये सहा कर्मचारी कोरोना बाधित झाले होते, यासाठी देखिल डोकटर शिंदेंचा भम्पक कारभार व त्यांची बेजबाबदार कार्यपद्धती कारणीभूत असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर शहर प्रशासन म्हणून मुख्याधिकारी डांगे हे देखील या बेजबाबदार व लाजिरवाण्या घडलेल्या एकूण सर्वच कृत्याला कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
गेल्या सहा दिवसांत कोरोनाची तपासणी झालेल्यांचा दोन दिवसांपूर्वी (गुरुवारी) दुपारी सव्वा दोन वाजता अहवाल जाहीर झाला. त्यात मंगळवार पेठतील महिला पॉझीटिव्ह आढळून आली. ती महिला घरीच क्वारंटाईन होती. तीचा अहवाल पॉझीटिव्ह आला. त्यानंतर कर्मचारी वर्गाने तिला अक्षरशः रस्त्याने चालवत नेऊन रुग्णालयात ऍडमिट केले. या बाबत कॉटेज हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. शिंदे यांना विचारणा केली असता ते म्हणाले,पेशंटला ऍडमिट करायला कस आणताहेत याची मला कल्पनाच नाही.म्हणजे हॉस्पिटलच्या प्रमुख कारभार्यालाच माहीत नाही त्या ठिकाणी कोरोना सारख्या गँभिर आजार असणाऱ्या पेशंटला ऍडमिट करायला कस आणतायत ते...म्हणजे डॉक्टर शिंदेंना या आजाराचे गांभीर्य माहीत नाही असं म्हणायचं का...? या आजाराचा संसर्ग झाला तर किती हाहाकार माजवतो हे ही त्या शिंदेंना सांगायला हवं का...? मग अशा गँभिर आजाराच्या पेशंटला रस्त्यावरून चालवत त्याच्याशी गप्पा मारत आणण्याइतपत इथं मजल मारली जाते, आणि या बाबतीत मला माहित नाही असं मुख्य अधीक्षक बरळतो... इतकं सहजपणे आणि बेजबाबदारपणे बोलण्यासारखी ही घटना आहे असं आपण समजायचं का...? डॉक्टर च्या असल्या ढिसाळ कारभारामुळे सदर दवाखान्यातील कर्मचारी काही दिवसांपूर्वी बाधित झाल्याची चर्चा असतानाच आज या दुसऱ्या घटनेने शहर व परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे शहर प्रशासन म्हणून मुख्याधिकारी डांगे यांनी या प्रकरणी जबाबदारीने लक्ष घालून डॉ .शिंदेशी समनवयाने सदर पेशंटला रुग्णवाहिकेतून आंणण्याबाबत सूचना करून वेळप्रसंगी रुग्णवाहिकेची व्यवस्था पालिकेमार्फत करायला हवी होती मात्र डांगेनि हेही केलं नाही. त्यांनी अस का व कशासाठी केलं...? याच उत्तरही त्यांना द्यावं लागणार आहे.. डांगे याच्या परवानगीनेच हा रुग्ण चालवत आणला का...?हे ही तपासावे लागणार आहे...
ही घडलेली घटना येथील अनेक व्हाट्सअँप ग्रुपवर चर्चेत आल्यानंतर शहरातील लोकप्रतिनिधी तसेच शहरातील अनेक सजग नागरिकांनी या संतापजनक घटनेचा निषेध नोंदवला, या एकंदर प्रकाराबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचेकडे त्यापैकी काही जणांनी तक्रार देखील केली आहे.
दरम्यान ना. शंभूराज देसाई यांनी या घटनेची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घटनेभोवती चर्चेत असणारे डॉक्टर शिंदें यांची या प्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. कॉटेज हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून तेच ऑन ड्युटी असताना हा प्रकार घडला आहे. त्यांच्या आदेशानेच कर्मचारी त्या पेशंटला चालत घेऊन आले...मात्र हा आदेश देण्याची परवानगी मुख्याधिकाऱ्यांनी त्याना दिली का...हे देखील पहावे लागणार आहे... डॉ.शिंदेंच्या हुबलकपणामुळे घडलेला या रुग्णालयातील हा दुसरा प्रकार आहे.तर डांगे यांनीही बेजाबाबदारीने या प्रकरणी ढिसाळपणा का होऊ दिला.. ?हाही प्रश्न आहेच... या एकूण प्रकरणाची चौकशी तर होईलच... मात्र याची चर्चा जोरात सुरू आहे.
No comments:
Post a Comment