Sunday, May 24, 2020

कराडच्या "ब्लु डायमंड ग्रुपचे' गरजूंना ईद साजरी करण्यासाठी सहकार्य

कराड
कोरोना महामारीचे संकट सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. त्या पार्श्वभूमीवर मधल्या काळातील लॉकडाऊन मुळे सर्व  व्यवहार  बंद होते. त्यामुळे  गोरगरीब जनतेचे  हाल  झाले.अनेकांनी मदतीचा हात पुढे करत आपली बांधीलकी जपल्याचेही पहायला मिळाले.  येथील ब्लु डायमंड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देखील आपल्या परीने गरजूंना मदत देण्याचे कार्य अद्याप सुरुच आहे. ईद सणाच्या निमित्ताने गरजू मुस्लिम बांधवांसाठी मदतीचा हात या डायमंड ग्रृप ने पुढे केला आहे त्यासाठी रमजान ईद सध्या सर्वत्र  साजरा होत असताना भागातील गरीब व गरजू मुस्लिम बांधवानादेखील ईद साजरी करता यावी यासाठी या ट्रस्ट च्या वतीने गरजू मुस्लिम बांधवाना ईद चे साहित्य नुकतेच देण्यात आले आहे .
 अनेक सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,अनेक नेते या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी लोकांसमोर येत आहेत .निरनिराळ्या माध्यमातून मदत करत आहेत.या प्रसंगी ही बांधिलकी जपण्याची गरज आहे. डायमंड ग्रुपच्या वतीनेदेखील गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व धान्य वाटप काही दिवसांपूर्वी करण्यात आले. 500 ते 600 मास्कचे वाटपदेखील सम्पूर्ण शहरातून या ग्रुपच्या वतीने केले गेले. आणि आता ईदच्या पार्श्वभूमीवर गरजू मुस्लिम बांधवांना केलेल्या मदतीतून डायमंड ग्रुपने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. शहरातून या ग्रुपचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment