Thursday, August 27, 2020

आज 155 जण झाले कोरोनामुक्त

 सातारा दि. 27 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 155 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 528 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 1, *कराड*तालुक्यातील 27, *खंडाळा* तालुक्यातील 1, *खटाव* तालुक्यातील 5, *कोरेगाव* तालुक्यातील 12, *महाबळेश्वर* तालुक्यातील 14,  *माण* तालुक्यातील 4, *पाटण* तालुक्यातील 13, *फलटण* तालुक्यातील 4, *सातारा* तालुक्यातील 67, वाई तालुक्यातील 7 असे एकूण 155 नागरिकांचा समावेश आहे.
 
*528 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 59, फलटण 26, कोरेगांव 32, वाई 31, खंडाळा 45,  रायगांव 28, पानमळेवाडी 48, मायणी 32, महाबळेश्वर 19, दहिवडी 33, खाबली 24 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 125   असे एकूण 528 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
0000

No comments:

Post a Comment