Friday, August 7, 2020

सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर यांचा आज वाढदिवस


कराड
येथील सोमवार पेठेतील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.जयंत बेडेकर हे नामदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.शहरातील लोकशाही आघाडीचे ते एकनिष्ठ खंदे समर्थक आहेत.समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही सध्या ते कार्यरत आहेत.

जयंत बेडेकर हे येथील सोमवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. टेलिफोन एक्स्चेंज येथे नोकरी करून त्यांनी काही दिवसांपूर्वीच निवृत्ती घेत स्वतःला सामाजिक कामामध्ये झोकून दिले आहे.मूलतः ग्राउंडवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.पांढरा शर्ट,हातात नॅपकिन आणि दुचाकी वाहनावरून असा कोणी व्यक्ती लोकांसाठी धावून आलेला पहिला की समजायचे हे दादा बेडेकरच आले ... समाजकार्याची प्रचंड आवड,लोकांसाठी धडपडण्याची तळमळ, आणि मुख्य म्हणजे आपुलकीने  एखाद्याला दरडवण्याची ही तयारी दादांची असते...अर्थात त्यातही लोकहीतच असते. ओम गणेश मंडळ च्या माध्यमातून त्यांचे काम अहोरात्र चालू असते.त्याच बरोबर ते नामदार बाळासाहेब पाटील यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही गावात परिचित आहेत त्यामुळे लोकशाही आघाडीच्या सर्वच कार्यक्रमातून ते अग्रेसर दिसतात. सध्याच्या लॉक डाऊन काळात अहोरात्र लोकांसाठी झटत बेडेकर दादांनी घरपोच अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घेत लोकांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले.नगरपरिषदेमध्ये एखाद्या नगरसेवकाईतकीच त्यांच्या शब्दाला किंमत असलेली पहायला मिळते. समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्थेचे ते सध्या अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. सोमवार पेठेतून त्यांच्या पत्नी सौ बेडेकर यादेखील पालिकेतील लोकशाही आघाडीच्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या.
सर्वच समाजात आपुलकीचे नाते असणाऱ्या व ते नाते जपणाऱ्या दादांचा आज वाढदिवस आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा...!!

No comments:

Post a Comment