कराड
येथील नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांचे पती उमेश शिंदे यांचेसह यांचे कुटुंबातील सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत अशी धक्कादायक माहिती स्वतः उमेश शिंदे यांनी आज दिली.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना संकटामध्ये नगराध्यक्षा यांनी रात्रंदिवस रस्त्यावर उतरून झपाटून काम केले होते. त्यावेळी त्या स्वतः पॉझिटिव्ह झाल्या होत्या. येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार घेऊन त्या नुकत्याच बऱ्या झाल्या आहेत. त्यांनी पुन्हा नव्या जोमाने शहरासाठी काम सुरू केले आहे. त्यांचे पती उमेश शिंदे यांनी सुध्दा या कोरोना संकटात नगराध्यक्षाना साथ देत आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. ते देखील 24 x 7 लोकांच्यात मिसळून काम करताना दिसत होते.गेल्या २/३ दिवसापासून त्यांना त्रास जाणवू लागल्यामुळे आज त्यांनी आपली स्वतः ची तसेच कुटुंबीयांची टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये ते स्वतः त्यांचे आई,वडील,भाऊ, भावजय तसेच घरातील २ लहान मुले असे सात सदस्य पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती .उमेश शिंदे यांनी स्वतः दिली असून लवकरच बरे होऊन पुन्हा लोकांच्या सेवेत हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment