अजिंक्य गोवेकर
कराड- येथील पालिका कर्मचाऱ्यांवर कामाचा फारच लोड असल्याचे सध्या दिसते आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्युदरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने या कर्मचाऱ्यांना सम्पूर्ण तालुक्याचा भार सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या पूर्वी काढलेला आदेश त्याला कारणीभूत आहे..?.आता हा आदेश बदलण्याची गरज आहे. त्यामुळेच येथील पालिका कर्मचार्यांवरील ताण कमी होणार आहे. या कर्मचार्यांकडे आता माणूस म्हणून पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी,कलेक्टर साहेब आता "तो' आदेश बदलून आताच्या गरजेनुसार त्यात बदल करा म्हणजे हा प्रश्न सुटेल असे लोकांचे म्हणणे आहे.
मागील काही दिवसांपूर्वी शहरातील व तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या फार नव्हती मृत्युदर देखील खूपच कमी होता. त्यावेळी कलेक्टर साहेबांनी एक "फतवा' काढला होता की तालुक्यात कोठेही एखाद्याचा कोविड ने मृत्यु झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराच्या सम्पूर्ण जबाबदारी ही कराड पालिकेची असेल,त्यानुसार आजही काम सुरू आहे. पणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळचा पेशंट चा रेशीओ आणि मृत्युदर आणि आताच्या घडीला त्यामध्ये झालेली प्रचंड वाढ यामध्ये खूपच फरक पडला आहे.त्यावेळच्या परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांचा निर्णय योग्य असेलही कदाचित... पण सध्या वाढती रुग्ण संख्या आणि मृत्युदर लक्षात घेऊन या आदेशामध्ये आता बदल करण्याबाबत विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथील पालिका कर्मचारी सध्याच्या घडीला रोज सरासरी 10 मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत.म्हणजे त्या मृतदेहाला त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचे प्लास्टिक पॅकिंग करून त्याला समशानात नेऊन दहन देण्यापर्यंत सर्व सोपस्कार हेच लोक करत आहेत. एक, एक करत रोज एवढ्या बॉडीना दहन देत त्यांचा दिवस आणि रात्र याच कामात जाते आहे. या कामासाठी कर्मचाऱ्यांना पीपीई किट तबबल आठ,आठ तास घालावे लागत आहे.या पीपीई किट मध्ये हवा जात नसल्या कारणाने या कामगारांची यावेळी अक्षरशः गुदमरून घुसमट होत असते ...कलेकटर साहेब इथल्या कामगारांची अशी रोजची परिस्थिती आहे...त्यामुळे कर्मचाऱ्यांवर,शारीरिक मानसिक खूपच ताण येत आहे.रात्री अपरात्री 2 कधी 3 वाजता फोन येतात त्यावेळी त्यांना तातडीने तालुक्याच्या भागात जावे लागते.असे कित्येक महिने रोज चालू आहे.. याचा सहानुभूतीने विचार होऊन... या समस्येवर ठोस उपाय काढा असे येथील लोकांचे म्हणणे आहे.
जिथे रुग्णाचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणच्या पंचायतीला किंवा तिथल्या संबंधित स्थानिक स्वराज संस्थेला त्याच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी द्या.त्यासाठी त्या त्या भागात गावापासून काही अंतरावर असणाऱ्या मोकळ्या एकाकी परिसरात कोविड स्मशानभूमी "कम्पलसरी' झाली पाहिजे यासाठी तेथील संबंधितांना सूचना करा. जबाबदारी त्या त्या भागाला दिल्यास येथील पालिका कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल,हे लक्षात घ्या... सध्या असणाऱ्या प्रचंड कामाच्या ताणामुळे या कामगारांची शारीरिक मानसिक स्थिती समजून घेतली पाहीजे. संबंधीत लोकप्रतिनिधींनी देखील याकामी लक्ष घालणे आता गरजेचे आहे. भविष्यात या कामाच्या ताणामुळे या कर्मचार्यांबाबत काही समस्या उदभवली तर त्याला जबाबदार कोण? ती देखील माणसंच आहेत,... याचा आतातरी विचार होणार आहे की नाही...? असा सवाल यानिमित्ताने कराडकर आता विचारू लागले आहेत.
No comments:
Post a Comment