Monday, August 10, 2020

आज जिल्ह्यातून एकूण 76 जण झाले कोरोनामुक्त

  सातारा दि.10 (जिमाका):   जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 76 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 404 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 *404 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 50, कराड यैथील 24, फलटण येथील 29, वाई येथील 72, शिरवळ येथील 40, पानमळेवाडी येथील 34, मायणी येथील 25, महाबळेश्वर येथील 10,  पाटण येथील 35, दहिवडी येथील 6 असे एकूण 404 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

*76  नागरिकांना आज डिस्चार्ज;*
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावळी तालुक्यातील* दुदुस्करवाडी येथील 4 पुरुष,  5  महिला,   
*कराड* तालुक्यातील आगशिवनगर येथील 2 महिला, 1 पुरुष, मलकापूर येथील  2 पुरुष, 1 महिला, कोयना वसाहत येथील 2 पुरुष, मंगळवार पेठ कराड येथील 1 पुरुष, रविवार पेठ कराड येथील 1 पुरुष, रविवार पेठ कराड येथील 1 पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 1 पुरुष व 1 महिला, उंब्रज येथील 2 पुरुष, रेठरे बु येथील 1 पुरुष, विद्यानगर येथील 1 महिला, सैदापूर येथील 1 महिला, करवडी येथील 1 महिला, कालवडे येथील 1 महिल, मुंडे येथील 2 महिला, खासगी रुग्णालय 1 पुरुष,गोवारे येथील 1 महिला, बुधवार पेठ कराड येथील 3 महिला, मुजावर कॉलनी कराड येथील 3 पुरुष, कार्वे येथील 2 महिला, 1 पुरुष, तांबवे येथील 1 महिला, 1 पुरुष, इंदोली येथील 3 पुरुष, करवडी येथील 1 महिला
*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 1 पुरुष, विंग येथील 1 महिला, 1 पुरुष, खंडाळा येथील 1 महिला
*खटाव* तालुक्यातील वडूज येथील 1 महिला,
*महाबळेश्वर* तालुक्यातील गोडोली, पाचगणी येथील 1  महिला, पाचगणी येथील 2 पुरुष, 2 महिला
*पाटण* तालुक्यातील तारळे येथील 3 पुरुष, नवसारी 1 महिला, नेरले येथील 2 महिला, निगडे येथील 1 पुरुष, आंब्राग येथील 1 पुरुष, जाधवाडी चाफळ येथील 1 महिला,
*सातारा* तालुक्यातील दिव्यनगरी शाहुपूरी येथील 1 महिला, कामाटीपूरा, सातारा येथील 1 पुरुष, रामकृष्णनगर येथील 1 पुरुष, 2 महिला, देशमुख कॉलनी, सातारा येथील 1 पुरुष, सदरबझार, सातारा येथील 1 महिला, दैवतनगर येथील 1 पुरुष
*वाई* तालुक्यातील शहाबाग येथील 3 पुरुष
*2 बाधितांचा मृत्यु*
वाई येथील खासगी हॉस्पिटल येथे बावधन ता. वाई येथील 80 वर्षीय कारोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पोलीस वसाहत, सातारा येथील 68 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने 32867
एकूण बाधित 5765
घरी सोडण्यात आलेले 2753
मृत्यू 180
उपचारार्थ रुग्ण 2832
000

No comments:

Post a Comment