सातारा दि. 14 (जिमाका) : जिल्हादंडाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या अनंषंगाने कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी , मिठाई पदार्थांचे उतपादन तसेच विक्री व वाटप करण्यास दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात मनाई आदेश पारित करण्यात आला आहे.
त्यानुसार कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे, याचाच अर्थ दुकाने बंद राहतील असा आहे.
कोरोना या विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी मोठ्या प्रमाणावर जिलेबी तसेच मिठाईचे वाटप होण्याची शक्यता असल्याने व परिणामी सोशल डिस्टसिंगचे पालन होणे शक्य नसल्याने, सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी सर्व प्रकारची मिठाई पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाटप करणारी सर्व मिठाईची दुकाने, स्टॉल, टपरी इत्यादी दि. 15 ऑगस्ट रोजी पूर्णपणे बंद ठेवायची आहेत.
No comments:
Post a Comment